झारखंडच्या राजकारणत आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. चंपई सोरेन यांनी जरी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असेल तरी देखील जोपर्यंत फ्लोर टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वातील सरकारवरील संकट कायम आहे. यादरम्यान झारखंडमधील सोरेन सरकार जाणार? की जेएमएम पक्ष विधानसभेत शक्ति प्रदर्शन करत मोठ्या फरकाने फ्लोर टेस्ट पास करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झारखंडमध्ये सध्या सत्तेत असलेल्या सरकारसाठी आज महत्वाचा दिवस आहे. कारण आज झारखंडमध्ये सरकार राहणार की जाणार याचा निर्णय होणार आहे. चंपई सोरेन यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे बहुमत आहे मात्र भाजप झारखंडमध्ये गेम होऊ शकतो असा दावा करत आहे. दोन्हीकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत.
आज झारखंड सरकार बहुमत सिध्द करणार आहे. यासाठी हैदराबदमध्ये ठेवण्यात आलेले आमदार रांची येथे पोहचले आहेत. मात्र आज विधानसभेतील फ्लोर टेस्टपूर्वी सरकारमध्ये काही आमदारांकडून विरोधाचे सूर देखील उमटताना दिसत आहेत.
या राजकीय घडामोडींदरम्यान झारखंडमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. साहिबगंज येथील जेएमएम आमदार लोबिन हेंब्रम यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी एका सभेच झारखंड मुक्ती मोर्चापासून वेगळे होण्याचे संकेत दिल्याने सर्वांना धक्का बसला आहे. इतकेच नाहगी तर जमीन घोटाळ्यातील आरोपी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
जेएमएम आमदार लोबिन हेंब्रम यांनी स्वतःच्या पक्षावर जोरदार टीका केली. मात्र फ्लोर टेस्टमध्ये चंपई सोरेन यांनाच पाठिंबा देणार असल्याचे देखील जाहीर केले. चंपई सोरेन यांनी यापूर्वीत 43 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र राज्यपालांना सोपवले आहे.
झारखंडमध्ये काय सुरू आहे ?
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यांनी चंपई सोरेन यांची उत्तराधिकारी, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नाव दिले आहे. जेएमएमच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या चंपई सोरेन यांनी शुक्रवारी राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंपई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने आता सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोर टेस्टची मागणी केली आहे.
झारखंडमध्ये आघाडीमधील 40 आमदार हे घोडेबाजर होण्याच्या भीतीने हैदराबाद येथे नेण्यात आले होते. मात्र फ्लोर टेस्टसाठी रविवारी सहा वाजता ते पुन्हा रांची येथे परतले आहेत. शनिवारी पीएमएलए कोर्टाने परवानगी दिल्याने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील विश्वासदर्शक ठरावात मतदान करण्यासाठी सभागृहात दाखल होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.