Train Accident: अपघात होण्यापूर्वी स्फोटाचा मोठा आवाज अन्... डीब्रूगड एक्सप्रेसच्या घातपाताचा संशय, तपासादरम्यान मोठी माहिती समोर

Chandigarh-Dibrugarh Train Accident: गुरुवारी दुपारी उत्तर प्रदेशातील गोंडा-मनकापूर रेल्वे मार्गावर मोतीगंज-झिलाही स्थानकांदरम्यान चंडीगढ़हून डीब्रूगडला जाणारी 15904 चंडीगढ़-डीब्रुगड एक्सप्रेसा मोठा अपघात झाला.
Chandigarh-Dibrugarh Train Accident
Chandigarh-Dibrugarh Train Accidentesakal
Updated on

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंडीगढ़-डीब्रूगड रेल्वे अपघाताबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ट्रेनच्या लोको पायलटने दावा केला आहे की, अपघात होण्यापूर्वी त्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आला होता. रेल्वेच्या सूत्रांनुसार, लोको पायलट त्रिभुवन यांनी हा दावा केला आहे. यानंतर रेल्वेने या प्रकरणाची संशय म्हणून तपास सुरू केला आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, डीब्रूगड-चंडीगढ़ एक्सप्रेसमधील एका प्रवाशानेही असा दावा केला आहे की, “मला हाजीपूरला जायचे होते. (घटनेच्या आधी) एक हलका स्फोट झाला आणि त्यानंतर एक जोरदार झटका बसला आणि कोच पटरीवरून उतरले. आम्ही चंडीगडहून येत होतो."

गुरुवारी दुपारी उत्तर प्रदेशातील गोंडा-मनकापूर रेल्वे मार्गावर मोतीगंज-झिलाही स्थानकांदरम्यान चंडीगढ़हून डीब्रूगडला जाणारी 15904 चंडीगढ़-डीब्रुगड एक्सप्रेसा मोठा अपघात झाला.  हा अपघात दुपारी 2:37 वाजता घडला, जेव्हा ट्रेन चंडीगढ़हून डीब्रुगडच्या दिशेने जात होती. या अपघातात ट्रेनचे एसी डब्बे उलटले. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य जलदगतीने करण्यात येत आहे. या मार्गावरील काही ट्रेनचे मार्ग डायवर्जन करण्यात आले आहेत आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध स्थानकांवर हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने मृत आणि जखमींसाठी मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपये अनुग्रह रक्कम देण्याची घोषणा केली आहे. सीआरएस तपासाबरोबर उच्चस्तरीय तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

Chandigarh-Dibrugarh Train Accident
Budget 2024 : देशाचं बजेट ज्यामध्ये दडलेलं असतं ती बॅग लाल रंगाचीच का असते?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निर्देश-

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी जाऊन मदत कार्यात वेग आणण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींच्या योग्य उपचारासाठी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार, आसपासच्या जिल्ह्यांतील सर्व रुग्णालये, सीएचसी, पीएचसी अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहेत. एसडीआरएफची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे आणि बचाव कार्यात सहभागी आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि आसाम सरकार परस्पर संपर्कात आहेत.

मदतकार्याची स्थिती-

उत्तर प्रदेशाचे राहत आयुक्त जीएस नवीन कुमार यांनी सांगितले की, या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. 40 सदस्यीय वैद्यकीय टीम आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित आहेत आणि अधिक वैद्यकीय टीम्स आणि रुग्णवाहिका तिथे पाठवण्यात येत आहेत. बचाव मोहिमेच्या देखरेखीसाठी वरिष्ठ रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी लखनऊपासून सुमारे 150 किलोमीटर दूर घटनास्थळी उपस्थित आहेत.

Chandigarh-Dibrugarh Train Accident
NEET Paper Leak : NEET पेपर लीक प्रकरणात पाटणा AIIMS मधील संशयित विद्यार्थांना CBI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.