Chandigarh Mayor Election: अखेर 'आप'चा उमेदवार बनला चंदिगडचा महापौर! सुप्रीम कोर्टानं दिले आदेश

Chandigarh Mayor Election : नुकतंच कोर्टानं या प्रकरणावर सुनावणी करताना बाद ठरवले गेलेले ८ नगरसेवक वैध ठरवले होते त्यानंतर हा निकाल आता बदलला आहे.
Supreme Court on Chandigarh Mayor Poll Case AAP Vs BJP votes at poll will be recounted 8 aap votes  treated as valid
Supreme Court on Chandigarh Mayor Poll Case AAP Vs BJP votes at poll will be recounted 8 aap votes treated as valid
Updated on

Chandigarh Mayor Election Marathi News: चंदिगड महापौर निवडणुकीत अखेर आम आदमी पार्टीचा महापौर वैध ठरला आहे. सुप्रीम कोर्टानं या वैधतेबाबत घोषणा करण्याचे आदेश दिले आहेत. नुकतंच कोर्टानं या प्रकरणावर सुनावणी करताना बाद ठरवले गेलेले ८ नगरसेवक वैध ठरवले होते त्यानंतर हा निकाल आता बदलला आहे. (chandigarh mayor election sc orders that aap candidate is declared validly elected candidate)

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठानं आदेश दिले की, महापौर निवडणुकीत बाद ठरवलेले आठ मतपत्रिका वैध मानले जातील. यामुळं सहाजिकचं आधीचा निकाल बदलला असून आम आदमी पार्टीचे महापौरपदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना महापौर घोषित करण्याचे आदेश देण्यात आले. (Latest Marathi News)

Supreme Court on Chandigarh Mayor Poll Case AAP Vs BJP votes at poll will be recounted 8 aap votes  treated as valid
Uddhav Thackeray: मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली 'ही' इच्छा; म्हणाले, कायदा...

खंडपीठानं म्हटलं की, याचिकाकर्त्यांना १२ मतं मिळाली होती. तर इतर आठ मतं ही चुकीच्या पद्धतीनं बाद ठरवण्यात आली. नंतर हीच आठ मतं याचिकार्त्याच्या बाजूनं असल्याचं समोर आलं, अशा प्रकारे आठ मत जोडल्यानंतर याचिकार्त्याची एकूण मतं २० इतकी होतात.

यामुळं आमचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना चंदिगडचे महापौर म्हणून निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं. पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी यापूर्वी भाजपचा नगरसेवक जिंकल्याचा निकाल अवैध ठरवला. (Marathi Tajya Batmya)

Supreme Court on Chandigarh Mayor Poll Case AAP Vs BJP votes at poll will be recounted 8 aap votes  treated as valid
Yugendra Pawar : अजित पवारांना घरातूनच विरोध! पुतण्या शरद पवार गटात, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार?

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, "अखेर सत्याचाच विजय झाला आहे. चंदिगडमध्ये महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. लोकशाहीच्या या मोठ्या विजयाच्या चंदिगडवासियांना अनेक शुभेच्छा"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.