नवी दिल्ली : चंदीगड महापौर निवडणुकीच्या निकालात फेरफार करणाऱ्या पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर कारवाई होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. कारण सुप्रीम कोर्टानं याबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे. अनिल मसिह यांनी आज सुप्रीम कोर्टात हजेरी लावली, यावेळी सुनावणी करताना कोर्टानं ही टिप्पणी केली आहे. (Chandigarh Mayor poll Supreme Court remarks that Anil Masih returning officer in has to be prosecuted)
कोर्टाचे कारवाईचे संकेत
सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, "चंदीगड महापौर निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अनिल मसिह यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी या निवडणुकीच्या निकालामध्ये फेरफार केल्याचं स्पष्ट झालं आहे" (Latest Marathi News)
दरम्यान, मतांची मोजणी करता येईल का याची खात्री करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं मतपत्रिका उद्या सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या निवडणुकीतील घोडोबाजारावरही चिंता व्यक्त केली आहे.
सुप्रीम कोर्टानं झाप झाप झापलं!
गेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं चंदीगड महापौर निवडणुकीत गैरप्रकार झाल्याबद्दल निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्याला झाप झाप झापलं होतं. तसेच मतमोजणीत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत, तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? असा सवालही केला होता. (Marathi Tajya Batmya)
कोर्टाच्या या कडक टिप्पणीनंतर काल रविवारी भाजपचे नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, यानंतर आता चंदीगड महापौरपदाची निवडणूक पुन्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत सुप्रीम कोर्टच आदेश देण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, २० जानेवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती होती. या दोघांनी मिळून भाजपविरोधात ही निवडणूक लढवली. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती कारण आप आणि काँग्रेस इंडिया आघाडीचा घटक म्हणून पहिल्यांदाच भाजपविरोधात निवडणूक लढवत होते. पण या निवडणुकीत आप आणि काँग्रेसच्या एकूण २० पैकी ८ नगरसेवकांची मतं पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी रद्दबातल ठरवलं होती. त्यामुळं इंडिया आघाडीचा पराभव होऊन भाजपचा विजय झाला होता. यामध्ये भाजपच्या उमेदवाराला १६ मतं पडली होती तर आपच्या उमेदवाराला १२ मतं मिळाली होती. (Latest Maharashtra News)
पण मतमोजणीत पीठासीन अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करत ही ८ मतं बाद ठरवल्याचा व्हिडिओ नंतर व्हायरल झाला होता. यावर आपनं जोरदार आक्षेप घेत थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यानंतर यावर सुनावणी करताना हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम असून हा गैरप्रकार करणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी टिप्पणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.