लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर काल उत्तर प्रदेशात काही अज्ञात लोकांकडून गोळीबार झाला. यामध्ये गोळी त्यांच्या कंबरेला घासून गेली त्यामुळं ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार झाल्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत त्यामुळं गेल्या २४ तासात काहीही कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. (Chandrashekhar Azad CM Adityanath protects criminals serious allegation on the firing incident)
आझाद म्हणाले, "हा आजचा हल्ला नाही, असे हल्ले वंचितांवर पूर्वीपासून होत आहेत. वंचित घटकातल्या अनेकांवर अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला झाला असून त्यात अनेकांचा जीव गेला आहे. पण आज कायद्याचं राज्य आहे, माझ्यासारख्या व्यक्तीसोबत जेव्हा हे होत असेल तर सामान्य वंचित घटकातील व्यक्तीसोबत काय होत असेल? यावरुन उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे आपल्याला समजायला हवं" (Latest Marathi News)
माझ्यावर हल्ला होऊन २४ तासांहून अधिक काळ लोटला या काळात आत्तापर्यंत काय कारवाई झाली हे तुमच्यासमोर आहे. मी तर जीवनमरणाचा लढा लढत होतो पण गुन्हेगार अद्यापही खुलेआम फिरत आहेत. अशा प्रकारे गुन्हेगारांनी मोकाटं फिरणं हे त्यांच्या डोक्यावर सत्ताधाऱ्यांचा हात असल्याशिवाय आणि त्यांना संरक्षण मिळत असल्याशिवाय होऊ शकत नाही, असंही यावेळी आझाद म्हणाले. (Marathi Tajya Batmya)
पोलिसांचं इंटेलिजन्स खातं काय काम करतंय? त्यांच्याजवळ काय माहिती आहे? अद्याप आरोपींना का पकडलेलं नाही? केवळ गाडी ताब्यात घेण्यात आली कारण गावातील लोकांनी सांगितलं की मेरखपूरमध्ये कोणीतरी गाडी सोडून गेलं आहे. अद्याप आरोपी मिळालेले नाहीत.
हा वंचितांचा मुलगा कोणत्या महाराणीचा नाही किंवा पोलीस आयुक्तांशी संबंधित हे प्रकरण नाही की चार पाच तासांत त्यांच्या कुत्र्याचा पत्ता लागेल. माझा हा आरोप की यात सरकारचं दुर्लक्ष होत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणात काहीच न बोलणं आणि केवळ मोठंमोठे दावे करणं यावरुन हे स्पष्ट होतं की मुख्यमंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. त्यांच्या संरक्षणात गुन्हेगार पोसले जात आहेत. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या विश्वासाला तडा देणारी असून मोठी गंभीर बाब आहे, अशा शब्दांत आझाद यांनी गंभीर आरोपही केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.