Chandrayaan-3 : भारत ऐतिहासिक वळणावर; ‘चांद्रयान-३’च्या यशासाठी देशभरात प्रार्थना

चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान-३’ यशस्वीपणे उतरावे, यासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहे.
Vikram Lander
Vikram LanderSakal
Updated on

नवी दिल्ली - चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान-३’ यशस्वीपणे उतरावे, यासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहे. अयोध्यात दिवाकरचार्य महाराजांनी पूजा, होम करून करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुयश चिंतले आहे.

लखनौमधील ऐशबाग इदगाह येथील जामा मशिदीत नमाज पठणानंतर इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी ‘चांद्रयान-३’ च्या ‘लँडिग’साठी ‘दुआ’ मागितली. यात अनेकजण सहभागी झाले होते. विविध राज्यांमधील मंदिरांमध्येही प्रार्थना करण्यात आल्या. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी चांद्रयानाची प्रतिकृती साकारली होती.

सोन्याचे दीड इंची शिल्प

कोईमतूर - कोईमतूर येथील लघुशिल्पकार मरिअप्पन यांनी भारताच्या ‘चांद्रयान-३’च्या विक्रम लँडरचे दीड इंच उंच मॉडेल शिल्प निर्माण केले आहे. विशेष म्हणजे या शिल्पासाठी सोन्याचा वापर केला असून चार ग्रॅम सोने त्यासाठी लागले आहे.

मरिअप्पन म्हणाले,‘‘चांद्रयान प्रकल्पात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञाप्रती कृतज्ञता म्हणून हे लघुशिल्प तयार केले आहे. जेव्हा काही महत्त्वाची घटना घडते तेव्हा मी सोन्याचा वापर करून लघुशिल्प बनवतो. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. चांद्रयान प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी चार ग्रॅम सोन्याचा वापर करून हे शिल्प तयार केले आहे. यासाठी मला ४८ तास एवढा वेळ लागला.’’

शाळांमध्ये ‘लँडिग’ पाहण्याची व्यवस्था

लखनौ ‘चांद्रयान-३’ बुधवारी (ता.२३) चंद्रावर उतरणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशमधील शाळा उद्या सायंकाळी एका तासासाठी खुल्या राहणार आहेत. विद्यार्थी चांद्रयानाचे ‘लँडिग’ यूट्यूबवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून मिळालेल्या आदेशानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चांद्रयानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी शाळांमध्ये खास सोय करण्याची सूचना दिली आहे. उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना चांद्रयानाची माहिती देण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.