Chandrayaan-3:चंद्राचे फोटो ज्या कॅमेऱ्यात काढले, त्याबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Chandrayan-3: चांद्रयान-३ने काढलेले चंद्राचे फोटो तुम्ही पाहिले असतील, पण फोटो काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य माहिती आहे का?
Chandrayaan-3:चंद्राचे फोटो ज्या कॅमेऱ्यात काढले, त्याबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Updated on

इस्रोने आपल्या ट्विटर हँडलवर चंद्राच्या पृष्ठभागाचा एक नवीन व्हिडिओ प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ विक्रम लँडरवर बसवण्यात आलेल्या LPDC सेन्सरने काढला आहे. वास्तविक हा एक कॅमेरा आहे, ज्याचे पूर्ण नाव लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा आहे. हा कॅमेरा बसवण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे चंद्रावरील खड्डे व्यवस्थित दिसावेत ज्याने लँडर सपाट ठिकाणी उतरु शकेल.

LPDC विक्रम लँडरच्या खालच्या भागात बसवण्यात आला आहे. जेणेकरून विक्रम लॅंडर स्वतःसाठी योग्य आणि सपाट जागा लँडिंगसाठी शोधू शकेल. या कॅमेऱ्याच्या मदतीने विक्रम लँडर कोणत्याही खडबडीत जागेवर उतरत नाहीये किंवा तो खड्डा किंवा खड्ड्यात तर जात नाही ना? हे या कॅमेऱ्याच्या मदतीने पाहिले जाईल.

लँडिंगच्या थोड्यावेळा आधी हा कॅमेरा पुन्हा चालू केला जाऊ शकतो. कारण नुकतेच आलेले चित्र पाहता हा कॅमेरा ट्रायलसाठी चालू केल्याचे दिसते. जेणेकरून तो किती चांगले काम करतोय हे चित्र किंवा व्हिडिओवरून कळू शकेल. चांद्रयान-२ मध्येही या सेन्सरचा वापर करण्यात आला होता.

LPDC चे काम विक्रमसाठी योग्य लँडिंग स्पॉट शोधणे आहे. लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC), लेझर अल्टिमीटर (LASA), लेझर डॉपलर वेलोसिटीमीटर (LDV) आणि लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (LHVC) किंवा पेलोडसह एकत्र काम करेल. जेणेकरून लँडर सुरक्षित पृष्ठभागावर उतरू शकेल. या उपकरणामुळे लँडरला कोणता धोका निर्माण होऊ शकतो, हे आधी कळू शकतं.

Chandrayaan-3:चंद्राचे फोटो ज्या कॅमेऱ्यात काढले, त्याबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा निमित्ताने केदार शिंदेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच 'ही' गोष्ट घडली

विक्रम लँडर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, तेव्हा त्याचा वेग सुमारे 2 मीटर प्रति सेकंद असेल. परंतु हॉरिझाँटल गती प्रति सेकंद 0.5 मीटर असेल. विक्रम लँडर 12 अंश कोन असलेल्या उतारावर उतरू शकतो. ही सर्व उपकरणे विक्रम लँडरला वेग, दिशा आणि सपाट जमीन शोधण्यात मदत करतील. ही सर्व उपकरणे लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 500 मीटर उंचीवर असताना कार्यान्वित होतील.(Latest Marathi News)

यानंतर, विक्रम लँडरमध्ये बसवलेले चार पेलोड काम करू लागतील. ते चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि वेगळेपणा तपासतील.

Chandrayaan-3:चंद्राचे फोटो ज्या कॅमेऱ्यात काढले, त्याबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
State Elections:महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार परराज्यात प्रवासाला, केंद्राकडून घेतली जाणार शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.