Chandrayaan 3: चंद्रावरील 'शिवशक्ती', 'जवाहर' पॉईंटवरुन जुंपली; काँग्रेसच्या विधानावर भाजपचा पलटवार

पंतप्रधान मोदींनी चंद्रावरील दोन ठिकाणांचं नामकरण केलं, यानंतर काँग्रेसनं हे हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं.
chandrayaan 3 mission pragyan rover deployed takes walk on moon vikram lander first photo of rover pragyan
chandrayaan 3 mission pragyan rover deployed takes walk on moon vikram lander first photo of rover pragyan sakal
Updated on

नवी दिल्ली : चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ या भारताच्या दोन्ही यानांनी चंद्राच्या जमिनीला ज्या ठिकाणी पहिल्यांदा स्पर्श केला त्या जागांचं PM मोदींनी आपल्या भाषणात अनुक्रमे तिरंगा आणि शिवशक्ती असं नामकरण केलं आहे. पण यावरुन काँग्रेसनं पंतप्रधानांवर सडकून टीका केली. या टीकेनंतर आता भाजपनं काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं या दोन्ही पक्षांमध्ये आता चंद्रावरील या दोन पॉईंटवरुन चांगलीच जुंपली आहे. (Chandrayaan 3 Shiva Shakti Jawahar point on moon BJP counter attack on Congress statement)

chandrayaan 3 mission pragyan rover deployed takes walk on moon vikram lander first photo of rover pragyan
Eknath Shinde News: फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता; फोन टॅपिंग प्रकरणावर CM शिंदेंचे वक्तव्य

काँग्रेसची टीका

चंद्रावरील पॉईंट्सच्या घोषणेनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते रशीद अल्वी यांनी टीका करताना पंतप्रधानांची ही कृती खूपच हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. संपूर्ण जग आपल्यावर हसतं आहे. पंतप्रधान मोदींना हा अधिकार कोणी दिला की त्यांना चंद्रावरच्या जागांचं नामकरण करायचं? असा सवाल करताना आपण चंद्रावर पोहोचलो ही चांगली बाब आहे.

आपल्याला त्याचा अभिमान आहे. पण आपण काही चंद्राचे मालक किंवा तिथल्या एखाद्या पाईंटचे मालक आहोत, असं अल्वी यांनी सकाळी एका वृत्तवाहिनीवर बोलताना म्हटलं होतं.

भाजपचा पलटवार

अल्वी यांच्या या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी काँग्रेसवर पलटवार केला. त्यांनी म्हटलं की, या विधानाद्वारे काँग्रेसनं स्वतःहून आपण हिंदू विरोधी असल्याचं दाखवूनद दिलं आहे. काँग्रेस हा तोच पक्ष आहे ज्यांनी श्रीरामावराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच राम मंदिराला विरोध केला होता, हिंदूंना शिवीगाळ केली होती. शिवशक्ती आणि तिरंगा ही दोन्ही नावं भारताशी आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित आहेत.

मग रशीद अल्वी यांना यामध्ये हास्यास्पद काय वाटतंय? काँग्रेसला पहिल्यांदा आपल्या कुटुंबाचंचं पडलेलं असतं. तर विक्रम लँडर हे नाव विक्रम साराभाई यांच्या नावावरुन ठेवलं असल्याचं पुनावाला यांनी म्हटलं आहे. युपीएनं कधीही चांद्रयान २ आणि ३ पाठवलेलं नाही. पाठवलं असतं तर ते उतरलं तिथल्या पॉईंटला यांनी इंदिरा पॉईंट आणि राजीव पॉईंट अशी नावं दिली असती, असंही पुनावाला यांनी म्हटलं आहे.

chandrayaan 3 mission pragyan rover deployed takes walk on moon vikram lander first photo of rover pragyan
Team India : BCCI करतंय भेदभाव? हे 5 भारतीय खेळाडू Yo-Yo टेस्ट न देता खेळणार आशिया कप

काय आहे जवाहर पॉईंट?

पहिल्या चांद्रयान मोहिमेदरम्यान हे यान चंद्रावर शॅकल्टन क्रिएटर जवळ जिथं क्रॅश झालं होतं, त्या जागेला जवाहर स्थळ म्हणून संबोधलं जातं. योगायोगानं ही घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली होती या दिवशी जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस असतो. त्यामुळं त्याला जवाहर पॉईंट असं म्हटलं आहे.

chandrayaan 3 mission pragyan rover deployed takes walk on moon vikram lander first photo of rover pragyan
Supriya Sule :सुप्रिया सुळेंनी घेतले भीमाशंकराचे दर्शन ; केली खास पार्थना

तिरंगा पॉईंट आणि शिवशक्ती पॉईंट काय आहे?

भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेवेळी विक्रम लँडर पहिल्यांदा ज्या जागी उतरलं त्या ठिकाणाला 'तिरंगा पॉईंट' तर चांद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडरनं ज्या ठिकाणी चंद्राच्या जमिनीला पहिल्यांदा स्पर्श केला त्याला 'शिवशक्ती पॉईंट' या नावांची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.