Chandrayaan 3 : विक्रम लँडरची मोठी उडी ! चंद्रावरील लक्ष्याच्या गेला पुढे... व्हिडिओ पहा

Chandrayaan 3 :
Chandrayaan 3 Update
Chandrayaan 3 UpdateeSakal
Updated on

Chandrayaan 3 : संपूर्ण भारतासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताचा अभिमान असलेले चांद्रयान-3 त्याच्या लक्ष्याहुन अधिक चांगली कामगिरी बजावत आहे.

यावेळी एका बाजूला प्रज्ञान रोव्हर ठाण मांडून बसला असून विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले कार्य करत आहे.

Chandrayaan 3 Update
Chandrayan 3: 'चांद्रयान' लँड होताच PM मोदींनी जाहीर केलं 'शुक्रयान'; काय आहे ही मोहीम? जाणून घ्या...

विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागा लँड झाले आहे. त्याने 40 सेंटीमीटर उंचीवर उडी मारली. यावेळी त्याने 30 ते 40 सेंटीमीटर अंतरही कापले.पुढे जाऊन विक्रमने पुन्हा सॉफ्ट लँडिंग केल्याचे इस्रोने ट्विट केले आहे.यावेळी विक्रम लँडरने आपल्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम केले आहे. यात उडी मारण्याचा प्रयोग पूर्ण झाला आहे.

Chandrayaan 3 Update
Chandrayan-3 : चांद्रयान चंद्रावर उतरवण्याची जबाबदारी घेणाऱ्या रितू करिधल कोण आहेत?
Chandrayaan 3 Update
Ajit Doval on Subhash Chandra Bose : नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर फाळणी झाली नसती - अजित दोवाल

अधिक माहिती अशी कि, कमांड दिल्यानंतर विक्रमचं इंजिन सुरू झालं. यावेळी तो हवेत 40 सेंटीमीटर वर गेला. यानंतर, 30-40 मीटर अंतरावर नवीन ठिकाणी सॉफ्ट लँडिंग केले. लँडरचे सर्व भाग आणि उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत. या उडीपूर्वी, लँडरचे काही भाग बंद करण्यात आले होते. सॉफ्ट लँडिंगनंतर ते पुन्हा उघडण्यात आले आहे.

Chandrayaan 3 Update
Mumbai Air Hostess Murder: मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसची गळा चिरुन निर्घृण हत्या!

चंद्राच्या ज्या भागात लँडर-रोव्हर उतरेल त्या भागाला पुढील 14-15 दिवस सूर्यप्रकाश मिळेल. नंतर अंधार पडायला सुरुवात होईल. लँडर-रोव्हरवर सूर्यप्रकाश पडणार नाही. यामुळे बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली असेल आणि सिस्टम बंद होतीलआणि बॅटरीच्या आधारे गरज पडल्यास ते पुन्हा चालू करता येतील.

लँडर आणि रोव्हरमध्ये सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत. सूर्यापासून ऊर्जा घेऊन ते चार्ज होतात. त्यानंतर रोव्हर आणि लँडर काही दिवस किंवा तास काम करू शकतात. ते त्यांच्या बॅटरीच्या चार्जिंगवर अवलंबून असते. मात्र त्यानंतर पुढील 14-15 दिवसांनी सूर्योदय होण्याची ते वाट पाहतील. सूर्य उगवल्यानंतर ते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()