सूर्याच्या बाह्यआवरणाची नावीन्यपूर्ण माहिती उघड; ‘इस्रो’कडून घोषणा

सूर्याच्या बाह्यआवरणाची नावीन्यपूर्ण माहिती उघड; ‘इस्रो’कडून घोषणा

Published on

बंगळूर : देशाच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-२’ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले असून यामध्ये सूर्याचे बाह्य आवरण आणि ‘हेलिओफिजिक्स’च्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण माहिती उजेडात आली असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) आज जाहीर करण्यात आले. चांद्रयानावरील उपकरणांनी सूर्याचा विविध अंगांनी अभ्यास केला आहे. (Chandrayaan instrument gives outstanding science results on solar corona heliophysics ISRO)

मूळ ऊर्जेचा उगम आणि सूर्याशी संबंधित विविध पैलूंची आपल्याला सखोल माहिती असली तरीसुद्धा मानवी जीवनावर प्रभाव टाकू शकणाऱ्या अनेक घटना या आजही आपल्यासाठी एक मोठे रहस्य आहे. यातील बहुतांश घटना या सूर्याच्या बाह्य आणि उष्ण आवरणामध्ये घडत असतात त्याला कोरोना या नावाने ओळखले जाते, असे इस्रोकडून सांगण्यात आले. अतिनील किरणांचा उगम याच भागात होतो. विद्युतचुंबकीय लहरींचे जन्मस्थान देखील हाच भाग आहे. कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर भारित गॅसचा समावेश असतो याचे तापमान दहा लाख केल्विनपेक्षाही अधिक असते. हे सूर्यावरील दिसून येणारे पृष्ठभागाचे सर्वोच्च तापमान होय.

सूर्याच्या बाह्यआवरणाची नावीन्यपूर्ण माहिती उघड; ‘इस्रो’कडून घोषणा
गर्लफ्रेंडच्या लग्नाचा सापळा; कुटुंबियांनी केला तरुणाचा घात

नव्या निरीक्षणातून वेगळी माहिती हाती लागली आहे. ऊर्जेच्या उगमस्थानापासून आपण जस-जसे दूर जातो तशी तापमानात घट होणे अपेक्षित असते, विज्ञानाच्या भाषेत यालाच ‘कोरोनल हिटिंग प्रॉब्लेम’ म्हणून देखील ओळखल्या जाते. नव्या निरीक्षणातून कोरोनाचा सर्वाधिक उष्ण असा भाग समोर आला आहे. सौर डागांवरील हा सर्वाधिक सक्रिय भाग म्हणून देखील ओळखल्या जातो. या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. कोरोनात निर्माण होणाऱ्या उष्णतेमध्ये चुंबकीय क्षेत्राचा मोठा वाटा असतो, असे नव्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.

सूर्याच्या बाह्यआवरणाची नावीन्यपूर्ण माहिती उघड; ‘इस्रो’कडून घोषणा
हाजीकासममधील सदनिकांच्या वादावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...

घटकांचे रहस्य उघड

कोरोनाच्या सक्रिय भागामध्ये काही विशिष्ट घटक तीन ते चारपटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. फोटोस्फेअरपेक्षा येथे या घटकांचे प्रमाण हे अधिक असते. जे घटक भारित होणे सुलभ असतात किंवा ज्यांना भारित होण्यासाठी कमी ऊर्जा लागते असे घटकच येथे मोठ्या संख्येने असल्याचे आढळून आले आहे. हे घटक नेमके कसे तयार होतात? याचे गौडबंगाल मात्र कायम आहे. अहमदाबादेतील फिजिकल रिसर्च लॅबरोटरीमधील संशोधकांचे पथक, अंतराळ विभागाच्या पथकाने विविध किरणांचा अभ्यास केला. या संशोधकांनी चांद्रयानाच्या एक्स-रे मॉनिटरचा (एक्सएसएम) वापर करून या किरणांचा वेध घेतला. यामुळे कोरोनासंबंधीची नवी माहिती उजेडात आल्याचे इस्रोच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()