Chandrayan 3 Date: तारीख ठरली! 'या' दिवशी अवकाशात झेपावणार चांद्रयान, ISRO सज्ज

Chandrayan 3 Date
Chandrayan 3 Date
Updated on

Chandrayan 3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान 3 साठी सज्ज झाली असून लवकरच ही मोहिम लॉन्च करण्यात येणार असल्याचं इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं. सतिश धवन स्पेस सेंटर इथून हे यानं चंद्राकडं झेपावणार आहे. चांद्रयान लॉन्च करण्याची तारीख ठरली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बुधवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात चांद्रयान-3 ला लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM-III) सह यशस्वीरित्या एकत्रित केले.

१४ जुलै २०२३ ला चांद्रयान-३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्राकडं पाठवण्यात येणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग हे चांद्रयान-३ चे लक्ष्य आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या मते, अंतराळ क्षेत्रात भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल.

काय आहे चांद्रयान-३ मिशन?

इस्रोच्या अधिकार्‍यांच्या मते, चांद्रयान-3 मोहीम चांद्रयान-2 चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल. हे चांद्रयान-2 सारखे दिसेल, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असेल.

चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदम सुधारले आहेत. चांद्रयान-2 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलेल्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

चांद्रयान-3 चे प्रक्षेपण चांद्रयान-2 च्या लँडर-रोव्हरच्या अपघातानंतर चार वर्षांनी होणार आहे. ही मोहीम चंद्राच्या त्या भागापर्यंत प्रक्षेपित करणे अपेक्षित आहे, ज्याला चंद्राची गडद बाजू म्हणतात. कारण हा भाग पृथ्वीच्या समोर येत नाही.

Chandrayan 3 Date
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद अन् अजित पवार मुख्यमंत्री?

चांद्रयान 3 च्या मोहिमेचा उद्देश काय?

चांद्रयान 3 हे चंद्राच्या पृथ्वीपासूनच्या सर्वाधिक दूर असलेल्या भागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं तर भारत हा जगातील चौथा देश बनले ज्या देशाकडं अशा प्रकारे मोहीम करण्याची क्षमता आहे. यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देशांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Chandrayan 3 Date
Team India: टीम इंडियातून डच्चू दिल्यानंतर स्टार खेळाडूला कॅमेऱ्यासमोर कोसळले रडू, केला मोठा खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.