chandrayan 3 landed successfully on moon today
नवी दिल्ली- चांद्रयान-३ चंद्रावर उतरल्याने भारताने इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा भारत पहिला देश ठरलाय. तर चंद्रावर जाणारा भारत जगात चौथा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी परदेशी गेले आहेत. त्यांनी यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. इस्त्रो वैज्ञानिकांच्या यशाचे मोदी यांनी कौतुक केले. तसेच भारतीय जनतेचे अभिनंदन केले.
चंद्राला मामा म्हणतो, चंदा मामा बहूत दूर के है, असे म्हटले जायचे. आता तो दिवस जवळ आले आहे. चंदा मामा एक टूर के है, असं म्हणत त्यांनी भारतीय वैज्ञानिकांची महत्वाकांक्षा व्यक्त केली. मोदी म्हणाले, मी ब्रिक्समध्ये आहे. पण आता प्रत्येक भारतीयासारखं माझं मनही चांद्रयान ३ मध्ये गुंतलेलं आहे. मी खूप आनंदी आहे. देशवासियांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे, असं ते म्हणाले.
जेव्हा आपण आपल्या डोळ्यांच्या समोर इतिहास घडताना पाहतो तेव्हा जीवन धन्य झाल्याचे दिसते. चिरंजीवी क्षण आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अद्भुत आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण अवघड महासागराला पार करण्याचा आहे.
हा जिंकण्याच्या नव्या वाटेचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या आशेचा आहे. नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. नव्या भारताचा आहे, असं मोदी म्हणाले. मी इस्त्रो, देशातल्या सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली आहे. त्यांचे आभार मानतो.
१४० जनतेला कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या शास्त्रज्ञांचे परिश्रम खूपच प्रेरणादायी आहे. जिथं कुणीही गेलं नाही तिथं आपण गेलो. आता यापुढे चंद्राविषयीच्या अनेक गोष्टी बदलून जातील. याचे कारण भारत आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.