Rahul Gandhi: जीएसटीत बदल करणार ते गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार;  राहुल गांधी भंडाऱ्यात काय म्हणाले?

Rahul Gandhi: भंडाऱ्यातील साकोली येथे राहुल गांधी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला.
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal
Updated on

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भंडाऱ्यात प्रचार सभा घेतली. भंडाऱ्यात काँग्रेसकडून प्रशांत पडोळे मैदानात उतरले आहेत. यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी आलो होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. भंडाऱ्यातील साकोली येथे राहुल गांधी यांनी सभा घेतली.

राहुल गांधी म्हणाले, "आमच्या जाहीरनाम्यातील ही 5 प्रमुख आश्वासने आहेत. आम्ही आमचा जाहीरनामा विचारपूर्वक तयार केला आहे. तो बंद खोलीत बनवला गेला नाही. हजारो लोकांशी बोलल्यानंतर तो बनवला गेला आहे... हा लोकांचा जाहीरनामा आहे"

काँग्रेसचे सरकार अल्यास जीएसटीमध्ये बदल करण्यात येतील, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल. तसेच गरिब कुटुंबातील महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार, असे आश्वासन देखील राहुल गांधी यांनी दिले.

आम्ही जनतेसाठी जाहीरनामा आणला आहे. मोदींनी शेतकऱ्यांनी साठी काय केलं. कोणती योजना आणली? कोरोना काळात लोकांवर उपचार झाले नाहीत. बेरोजगारी महागाईवर कोणी बोलायला तयार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
Arvind Kejriwal: "तुरुंगात केजरीवालांवर अन्याय, मुलभूत हक्कही नाकारले जात आहेत," 'आप'चा आरोप

राहुल गांधी म्हणाले, १० वर्ष नरेंद्र मोदी यांनी निवडक उद्योगपतींसाठी सरकार चालवलं. सगळं अदानींसाठी केलं जात. मुंबईतील विमानतळ देखील अदानींना दिले. पायाभूत सुविधांमध्ये देखील त्यांचा फायदा आहे. वीज पवनचक्क्या, खाणी अदानींना दिल्या. २२ लोकांच्या हाती देशातील ५० टक्के पैसा आहे. मोदींनी सगळ्या गोष्टींची चेष्टा चालवली आहे.

नरेंद्र मोदी २४ तास धर्मावर बोलतात. माझ्या पदयात्रेत सगळे बेरोजगारी, महागाईवर बोलत होते. पुजारी नाही तरी मोदी समुद्राखाली पुजा करतात. तर कधी हवेत दिसतात.

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : ठरलं! लोकसभा निवडणुकीत कंगना रणौतच्या विरोधात उभा राहणार काँग्रेसचा 'हा' नेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com