नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक महत्वाचे बदल करण्यात आल्यानं आता नागरिकांसह सर्व सरकारी तसेच खासगी कार्यालयांना याची माहिती करुन घेणं गरजेचं ठरणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणाही केली आहे. यासाठी भाजपनं पुढाकार घेतला आहे. (Changes in Flag Code by Central govt now new rules for hoisting the national flag)
केंद्र सरकारने आज देशाच्या ध्वज संहितेत बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळं आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकाविता येणार आहे. त्याचबरोबर पॉलिस्टरपासून तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येईल. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणाही केली आहे.
बदलाबाबतचे पत्र सर्व मंत्रालयांना पाठवले
दरम्यान, ध्वज संहितेमध्ये करण्यात आलेले बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम हे भारताची ‘ध्वज संहिता-२००२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१’ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत.
पूर्वी कसे होते नियम?
याआधी केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकाविता येत असे. सूर्य मावळल्यानंतर राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी नव्हती. त्याचबरोबर मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.