INDIA vs NDA: शहरांची नाव बदलण्यासाठी फेमस असणारे CM योगी म्हणतात, "नाव बदलून काय होणार?"

योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील शहरांची नाव बदलण्यासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या INDIA या आघाडीवरुन टीका केली आहे. नाव बदलल्यानं तुमचा खेळ बदणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कोटी केली आहे.

पण त्यांची ही कोटीच त्यांच्यावर उलटल्याचं चित्र आहे. कारण त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. यामध्ये त्यांनी योगींना अनेक सवाल विचारले आहेत. (Changing your name will not change your game says Yogi Adityanath on opposition front INDIA)

योगींनी काय केलयं ट्विट?

भाजपविरोधी पक्षांनी INDIA नावाची आघाडी तयार केली आहे. यावरुन देशभरात आजचा दिवस चांगलाच गाजला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून याला सुरुवात झाली. कारण सकाळी त्यांनी या आघाडीच्या नावावर टीका करताना त्याची तुलना थेट 'ईस्ट इंडिया कंपनी', इंडियन मुजाहिद्दीन अशा संघटनांशी केली.

त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही पंतप्रधानांचा कित्ता गिरवला आणि INDIAवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ट्विट केलं. या ट्विटमध्ये ते म्हणतात, तुमचं नाव बदलल्यानं तुमचा खेळ बदलणार नाही. हा INDIA विरुद्ध I.N.D.I.A आहे.

Yogi Adityanath
Trishna Vishwasrao: "मुख्यमंत्री इर्शाळवाडीत डोंगर चढून गेल्यानं प्रभावित"; माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

नेटकऱ्यांनी विचारले सवाल

योगींच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांना त्यांनाच ट्रोल केलं. अनेकांनी तर त्यांना असे प्रश्न विचारले ज्यामुळं ट्विट करुन आपण चूक केली की काय असंही त्यांना वाटू शकतं. नेटकरी योगींना म्हणतात,

  1. "पूर्वी : अजय सिंह बिष्ट, आता : योगी आदित्यनाथ"

  2. "जर ठाकूर योगी बनू शकतो आणि योगी खासदार आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. तर नक्कीच नाव खेळ बिघडवू शकतो"

  3. "मणिपूरचा आरोप दुसऱ्यांवर ढकलला तरी खेळ बदलणारा नाही"

  4. "जसं अलाहाबाद ते प्रयागराज"

  5. "योगीजी तुम्ही असेच ट्विट करत राहा"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()