पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. भाजपचे आदर्श असलेले देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Vallabhbhai Patel) यांच्या एका विधानाचा संदर्भ देत त्यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. यापूर्वीही चन्नी यांनी भाजपच्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पंजाबमधील काँग्रेस सरकारने हत्येच्या हेतूने पंतप्रधान मोदींचा जीव धोक्यात आणला आणि जाणूनबुजून त्यांच्या सुरक्षेला धोका दिला या भाजपच्या आरोपाला जोरदार उत्तर देण्याचं काम चन्नी यांनी केलं.
'ज्या व्यक्तिला आपल्या कर्तव्यापेक्षा आपल्या जीवाची जास्त काळजी असेल अशा व्यक्तीने भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी घेऊ नये' असं सरदार पटेल यांचं वाक्य चन्नी यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे. तसंच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून तुमच्या जीवाला नेमका कुठे धोका होता? तुमच्या एक किलोमीटरच्या परिसरात कोणीही नव्हतं. दगडफेक झाली नाही, गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत, घोषणाबाजीही झाली नाही. तुम्ही असे कसे म्हणू शकता?' असे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, एवढ्या मोठ्या नेत्याचं एवढं संवेदनशील विधान येतं. लोकांनी तुम्हाला पंतप्रधान म्हणून मतदान केलं. तुम्ही जबाबदारीनं वक्तव्य करायला हवं असं मत चन्नी यांनी व्यक्त केलंय. चन्नी यांनी भाजपने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एकुणच या सर्व प्रकरणात भाजप जाणीवपूर्वक पंजाबची बदनामी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधानांचा ताफा अडकला त्याठिकाणी काही भाजप कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचे व्हिडीओ देखील समोर आलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.