चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना मिळणार 1 लाखांचं विमा संरक्षण

Chardham Yatra
Chardham Yatraesakal
Updated on
Summary

भारतीय धर्मग्रंथांमध्ये धार्मिक प्रवास अर्थात तीर्थयात्रेला खूप महत्त्व आहे.

नवी दिल्ली : भारतीय धर्मग्रंथांमध्ये धार्मिक प्रवास अर्थात तीर्थयात्रेला खूप महत्त्व आहे. बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी चारधामला भेट द्यावी असं वाटतं. धार्मिक ग्रंथांमध्ये बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी आणि रामेश्वरम यांची चारधाम म्हणून वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमधील (Uttarakhand) बद्रीनाथ व्यतिरिक्त केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचाही या धामांमध्ये समावेश आहे.

Chardham Yatra
हिमाचल प्रदेश : कुल्लूमध्ये पॅराग्लायडिंग करताना पायलटसह दोघांचा मृत्यू

उत्तराखंड सरकारकडून (Uttarakhand Government) प्रथमच चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या यात्रेकरूंना 1 लाख रुपयांचं अपघात विमा संरक्षण (Insurance Protection) दिलं जाणार आहे. किंबहुना, गेल्या काही वर्षांत चारधामला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या मृत्यूच्या घटना वेगवेगळ्या कारणांमुळं वाढल्या आहेत. उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री इथं एखाद्या यात्रेकरूचा अपघाती मृत्यू झाल्यास, मंदिर समिती मानव उत्थान सेवा समितीच्या सहकार्यानं विमा देईल. विम्याची रक्कम युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत (United India Insurance Company) दिली जाईल.

Chardham Yatra
'2032 पर्यंत सैन्यात 50 टक्के 'अग्निवीर' असणार, दरवर्षी दीड लाख तरुणांची होणार भरती'

सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांचा पुढाकार

केदारनाथ-बद्रीनाथ मंदिर समितीचे (Kedarnath-Badrinath Temple Committee KBTC) मीडिया प्रभारी हरीश गौड यांनी सांगितलं की, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आध्यात्मिक संस्था मानव उत्थान सेवा समितीच्या वतीनं यात्रेकरूंना विमा संरक्षण प्रदान करेल. या समितीची स्थापना उत्तराखंडचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज (Minister Satpal Maharaj) यांनी केलीय. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी अपघाती विमा संरक्षणासाठी मानव उत्थान सेवा समितीचे संस्थापक आणि पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून विमा संरक्षणाची माहितीही दिलीय.

आतापर्यंत 110 यात्रेकरूंचा मृत्यू

पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने दरवर्षी लाखो यात्रेकरू बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट देतात. गेल्या काही वर्षांत यात्रेकरूंच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. 2017 मध्ये 112, 2018 मध्ये 102 आणि 2019 मध्ये 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. या वर्षी 3 मेपासून यात्रा सुरू झाल्यापासून 110 हून अधिक भाविकांचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी हा मोठा निर्णय घेतलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.