Charles Sobhraj : चार्ल्स शोभराज म्हणतो, कंदहार विमान अपहरणावेळी वाजपेयी सरकारनं माझं ऐकलं असतं तर..

सध्या सोशल मीडियावर शोभराजचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय
Charles Sobhraj
Charles Sobhrajsakal
Updated on

नेपाळच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असणारा 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज ची लवकरच सुटका होणार आहे. न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहे. त्यामुळे सध्या तो सगळीकडे चर्चेत आलाय. शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. 

सध्या सोशल मीडियावर शोभराजचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. या मुलाखतीत त्याने 2003 मध्ये नेपालमध्ये झालेल्या अटकेविषयी बातचीत केली. सोबतच त्याने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरसोबतच्या भेटींची उल्लेख केला.

२४ डिसेंबर १९९९ मध्ये कंदहार या ठिकाणी भारतातलं एक विमान प्रवाशासह हायजॅक करण्यात आलं होतं. या दरम्यान सर्वात मोठा दहशतवादी मसूद अझहरसह आणखी दोन दहशतवादी भारताच्या ताब्यात होते. अशावेळी भारताकडे पर्याय दिला होता की तुम्ही जर मसूद अझहरची सुटका केली तर आम्ही तुमचे प्रवासी परत करू. यासाठी भारताला ११ दिवस देण्यात आले होते.

Charles Sobhraj
Charles Sobhraj: बिकिनी किलरला पकडणारा मराठमोळा अधिकारी

शोभराजने याच घटनेचा उल्लेख आपल्या मुलाखतीत केलाय. शोभराज म्हणाला, " त्यावेळी जसवंत सिंह (परराष्ट्र मंत्री) त्याच्या संपर्कात होते. त्यांनी मला भेटायला पॅरीसमध्ये एक दूत पाठवला होता.

या मुलाखतीत आणि जसवंत सिंह यांच्यासोबत झालेल्या बातचीतनंतर मी मसूदची पार्टी हरकत उल अंसारच्या लोकांशी संपर्क साधला. तेव्हा त्या लोकांनी प्रवाशांना जीवंत सोडण्यास नकार दिला होता पण मी त्यांना विश्वासात घेत म्हटले की ११ दिवस तुम्ही प्रवाशांना काहीही करू नका आणि त्यानंतर त्यांना मारा."

Charles Sobhraj
Bikni killer: चार्ल्स शोभराज बिकनी किलर नाव कसं पडलं ?

पुढे शोभराज म्हणतो, " जसवंत सिंह जेव्हा फोन केला आणि सांगितले की ११ दिवस प्रवाशांना काहीही होणार नाही. तुमच्याकडे ११ दिवस आहे. अशावेळी भारताकडे मसूद अझहरसह अन्य दोन दहशतवाद्यांची सुटका करण्याशिवाय कोणताच मार्ग नव्हता.

Charles Sobhraj
Charles Sobhraj : 20 हून अधिक मुलींची हत्या करणारा 'बिकिनी किलर' कोण?

त्यावेळी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. भारतीय कैदेत असणारे मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यावेळचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी विशेष विमानाने या तिन दहशतवाद्यांना आपल्यासोबत घेऊन कंधारला गेले. आणि तिघांची कंदहार येथे सुटका करण्यात आली तेव्हा कुठे अपहरण झालेल्या 155 प्रवाश्यांना सोबत घेऊन जसवंत सिंह परत आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.