Chattisgarh Crime: मुलींकडे टक लावून पाहायचा; संतापलेल्या आई व अल्पवयीन मुलींनी तरुणाची हत्या करत झाडाला लटकावले

Crime News: आरोपी महिलेने खून केल्याची कबुली दिली आहे. भाऊ आणि मुलीसह हे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले. संजय असे मृताचे नाव असून तो गेल्या पाच वर्षांपासून तेथे राहत होता.
Chattisgarh Crime News
Chattisgarh Crime NewsEsakal
Updated on

एका व्यक्तीची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याप्रकरणी सूरजपूर पोलिसांनी एक महिला, तिचा भाऊ आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे.

आरोपीने सांगितले की, हा व्यक्ती अनेकदा अल्पवयीन मुलींचा विनयभंग करत असे आणि 1 मेच्या रात्री त्या एका मुलीला रिकाम्या घराकडे ओढत नेत होता, त्यावेळी 'स्वसंरक्षणासाठी' त्याची हत्या केली.

हा व्यक्ती प्रतापपूर परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर मृतदेह पाहून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि शवविच्छेदन अहवालात गळा दाबून आणि मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. (Chattisgarh Crime News)

दरम्यान, आरोपी महिलेने खून केल्याची कबुली दिली आहे. भाऊ आणि मुलीसह हे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले. संजय असे मृताचे नाव असून तो गेल्या पाच वर्षांपासून तेथे राहत होता. तो मजुरीचे काम करायचा आणि नेहमी दारूच्या नशेत असायचा.

ही घटना १ मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुलगी घाबरून असे पाऊल उचलू शकते का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Chattisgarh Crime News
Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

1 मे रोजी रात्री सर्वजण झोपलेले असताना अल्पवयीन मुलीच्या ओरडण्याने त्यांना जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा करून त्या दिशेने धाव घेतली.

बाहेर जाऊन पाहिले असता संजयने मुलीला ओढत आपल्या घराकडे नेले. त्याच्या या कृत्यामुळे संतापलेल्या महिलेसह इतर लोकांनी मिळून संजयला मारहाण करून दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. आणि नंतर आत्महत्या केल्यासारखे वाटावे यासाठी झाडाला लटकवले. महिला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली, तर अल्पवयीन मुलांना बालगृहात पाठवण्यात आले आहे.

Chattisgarh Crime News
Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; पाहा व्हिडिओ

या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक एम.आर.अहिरे यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या.

पंचनामा केल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पोलिसांनी कुटुंबीय आणि ग्रामस्थांची चौकशी केली. मृताचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने, अहवाल प्राप्त झाला ज्यामध्ये डॉक्टरांनी मृताचा मृत्यू खून असल्याचे घोषित केल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.