मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या विरोधकांची प्रकरणे बाहेर काढण्याबाबत प्रसिद्ध आहेत. विरोधकांवर टीका करुन त्यांची घोटाळ्याची कुंडली बाहेर काढत असल्याचा त्यांचा नेहमीचा दावा असतो. त्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे याप्रकारे घोटाळे बाहेर काढल्याचा दावा केला आहे. आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. किरीट सोमय्या (Kirtit Somaiya) यांनी काल सोमवारी मंत्रालयात जाऊन फाईल्स बघितल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. (Uddhav Thackeray)
सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल घेतली असून मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. काल किरीट सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये आज गेले होते. तिथे ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स बघितल्या. कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स चेक करतानाचे किरीट सोमय्या यांचे हे मंत्रालयातील फोटो व्हायरल झाले आहेत.
मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही. मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली, असे स्पष्टीकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याची छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले. तसेच मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला होता.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोणत्या अधिकाराखाली मंत्रालयात जाऊन अशाप्रकारे फाईल्स बघितल्या आहेत? असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे. तसेच अधिकार्यांनीही कोणत्या अधिकारात या फाईल दाखवल्या याबाबत चर्चा मंत्रालयात चर्चा सुरू आहे. किरीट सोमय्या यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी कार्यालयात घुसखोरी या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सचिन सावंत यांनी म्हटले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.