केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; १२ कामगारांचा होरपळून मृत्यू

Chemical factory boiler explodes in uttar pradesh
Chemical factory boiler explodes in uttar pradeshChemical factory boiler explodes in uttar pradesh
Updated on

हापूर : बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीला आग (Chemical factory boiler explodes) लागली. या भीषण आगीत बारा मजूर जिवंत (death) जळाले. तर तर २१ मजूर गंभीर भाजले. कारखान्यात आणखी कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये शनिवारी (ता. ४) घडली. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले होते. जळालेल्या लोकांना मेरठ आणि गाझियाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे जवळपासच्या तीन कारखान्यांचेही नुकसान झाले आहे. (Chemical factory boiler explodes in uttar pradesh)

हापूर जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडी कारखाना आहे. या कारखान्यात केमिकल (Chemical factory) बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करीत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.

Chemical factory boiler explodes in uttar pradesh
जुन्या वादातून एकाला चारली विष्ठा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अपघातावेळी कारखान्यात सुमारे अनेक कामगार काम करीत होते. या अपघातात बारा मजूर जिवंत भाजले (death) आहेत. तर तर २१ मजूर गंभीर भाजले. अनेक कामगार दगावल्याचेही वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारखान्यात मदतकार्य सुरू आहे. कारखान्यात दोन डझन लोक अडकल्याची शक्यता आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हापूर जिल्ह्यात बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत बारा मजुरांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले आहे. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. बॉयलर स्फोट प्रकरणी तज्ज्ञांकडून चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Chemical factory boiler explodes in uttar pradesh
रुबेलाचे कारण देत तुर्कीने परत पाठवला भारताचा गहू

फक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यास परवानगी होती

ज्या कारखान्यात हा अपघात झाला त्या कारखान्यात फक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यास परवानगी होती. मात्र, येथे नेमके काय घडत आहे याची चौकशी केली जाईल. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले, असे डीएम मेधा रुपम म्हणाल्या.

मालक आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आयुक्त, एडीजी आणि आयजी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. कारखान्यात बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून निघणाऱ्या ठिणगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कारखाना मालक आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतदेहांचे सांगाड्यात रूपांतर झाले

कारखान्यात स्फोट झाल्यानंतर तिघांचे मृतदेह बाहेर येऊन पडले. इथली परिस्थिती मन हेलावून टाकणारी होती. आगीमुळे अनेक मृतदेहांचे सांगाडे झाले होते. याशिवाय अनेक मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटणे शक्य नव्हते.

Chemical factory boiler explodes in uttar pradesh
मुसेवालाच्या पालकांनी घेतली शाहांची भेट; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

चाचणीसाठी नमुने घेतला

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. स्फोटाची कारणे इतर ठिकाणी तपासली जात आहेत. तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे आयजी म्हणाले.

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

हापूरमधील घटनेवर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकार पीडितांना मदत करण्यात गुंतले असल्याचा दावा केला आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ड्रोनच्या सहाय्याने आढावा घेतला

तीन वाजता जोरदार स्फोट होताच पाच किमीपर्यंत लोक घाबरले. शेजारी असलेल्या तीन कारखान्यांचेही नुकसान झाले, तर या कारखान्याचे टिनचे छत, भिंत आणि मशीनही उडून गेली. सायंकाळी सात वाजता प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने जवळपास असलेल्या कारखान्यांच्या छताचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.