NEET दोन वेळा नापास झाल्याने मुलाची आत्महत्या, अंत्यसंस्कारानंतर वडिलांनी देखील घेतला गळफास

Chennai 19-Yr-Old Ends Life After Failing to Clear NEET Twice Father Hangs Self Next Day
Chennai 19-Yr-Old Ends Life After Failing to Clear NEET Twice Father Hangs Self Next Day
Updated on

Chennai News : तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून एका व्यक्तीने आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून NEET परीक्षेत वारंवार नापास झाल्याने किशोरने आत्महत्या केली. यानंतर त्याच्या वडिलांनी मुलावर अंत्यसंस्कार केले आणि रविवारी वडिलांनी तामिळनाडूतील चेन्नई येथील क्रोमपेट भागात असलेल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Chennai 19-Yr-Old Ends Life After Failing to Clear NEET Twice Father Hangs Self Next Day
Venkatesh Prasad : 'तुमचा आवडता खेळाडू आहे म्हणून आंधळे...' प्रसादने पांड्याची काढली खरडपट्टी

19 वर्षीय एस जेगादेश्वरनने 2022 मध्ये बारावी पूर्ण केली होती. तेव्हापासून तो दोनदा एनईईटीला बसला. मात्र दोन्ही वेळा तो अपयशी ठरला, या नैराश्यातून त्याने त्याने शनिवारी दुपारी घरी एकटा असताना आत्महत्या केली. यादरम्यान त्याचे वडील त्याला सतत फोन करत होते, पण संपर्क होऊ शकला नाही. यानंतर त्यांनी घरातील नोकराला खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले.

Chennai 19-Yr-Old Ends Life After Failing to Clear NEET Twice Father Hangs Self Next Day
Wi vs Ind : "दोन पराभवानंतर कमबॅक करू शकलो पण..." कोच राहुल द्रविडने सांगितले टी-20 मालिकेतील अपयशाचे कारण

घरकामगार खोलीत गेल्यावर त्याला जेगादेश्वरनने आत्महत्या केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर घाईघाईत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दोनदा परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याने निराश झाल्याने आपल्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले होते. दुसरीकडे मुलाचे दु:ख सहन न झाल्याने त्याच्या वडिलांनी रविवारी गळफास लावून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.