CHETAK FESTIVAL: सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दीड कोटीची 'शनाया' ठरते विशेष आकर्षण

सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या निमित्ताने नंदूरबारमध्ये वेगळे चैतन्य पाहायला मिळते.
CHETAK FESTIVAL
CHETAK FESTIVALEsakal
Updated on

CHETAK FESTIVAL: चेतक महोत्सव ही प्राचीन अश्वजत्रा असून त्याचे आता महिन्याभराच्या सोहळ्यात रूपांतर झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या किनाऱ्यावरील आकर्षक गावांमध्ये अनेक वर्षांपासून ही जत्रा सुरू आहे. या महोत्सवात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात येथील घोडे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या निमित्ताने नंदूरबारमध्ये वेगळे चैतन्य पाहायला मिळते. या ठिकाणी अश्व प्रदर्शन, अश्व शर्यती, त्याचप्रमाणे लावणी नृत्य, कवी संमेलनासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवाकडे जगभरातील पर्यटक आकर्षित होतात. या निमित्ताने या भागातील कला, संस्कृती आणि विविध पैलूंचे दर्शन घडवणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. 

CHETAK FESTIVAL
राऊत, फडणवीस यांच्यात गाजत असलेल्या 'घोडेबाजार' शब्दाला १०० वर्षांचा इतिहास

यंदा सारंगखेडा चेतक फेस्टिवल मध्ये यावर्षी पहिल्यांदाच आश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी लागणारे धावपट्टी आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात असून आयोजकांच्या वतीने चेतक फेस्टिवल ची तयारी करण्यात येत आहे . फेस्टिवल मध्ये यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व नृत्य स्पर्धा,घोड्यांचा रेस ,तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत घोडेबाजाराची तयारी पूर्ण झाली असून देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे आतापर्यंत विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दीड कोटीची 'शनाया' ठरते विशेष आकर्षण...

यंदा उत्तर प्रदेशातून आलेल्या 1 कोटी 51 लाख रुपयांच्या ‘शनाया’ या घाेडीचे विशेष आकर्षण आहे.महिन्याला होतो 77 हजारांचा खर्च : 70 इंची उंची अन् 4 वर्षे 4 महिन्यांचे वय असलेली ‘शनाया’ घोडी नुकरा प्रजातीची आहे. तिच्या देखरेखीसाठी दोन सेवक 24 तास कार्यरत असतात. तिच्यासाठी स्वतंत्र खोली तयार केली आहे. पंजाबमधील जक्तार सिंग यांनी शनायाची बोली 71 लाख रुपये लावली होती; परंतु तिच्या मालकांनी ती विकली नाही.

CHETAK FESTIVAL
Winter Recipe: हिवाळा स्पेशल मेथी कढीगोळे कसे तयार करायचे?

शनाया घोडीचे खाद्य तर नेमके काय असेल बर ?

शनाया’ला रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी 7 लिटर दूध दिले जाते. चणे, मका, गहू, बाजरी, ज्वारीचा भुसा, शिवाय शेताच्या बांधावरील ताजा चारा खायला दिला जातो. महिन्यातून 4 ते 5 वेळा काजू, बदाम खाऊ घातले जातात.भारतातील सर्वात उंच घोडी म्हणून शनाया ओळखली जाते. शनाया ही भारतातील सर्वात उंच घोडी गुलझार वंशाची आहे. तिला एक 16 महिन्यांचे शिंगरू आहे. तिचा जन्म शनिवारी झाला होता म्हणून तिचे नाव शनाया ठेवण्यात आले. असे तिचे मालक सांगतात.

CHETAK FESTIVAL
Winter Recipe : हिवाळ्यात ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक भजी कसे तयार करायचे?

शनाया इतके महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्व शौकीनांना शक्य नसते. त्यामुळे देशभरातील अश्वप्रेमी कुलीन घोड्यांना पाहण्यासाठी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावत असतात. सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये दत्त जयंतीपासून अधिक रंगत आली आहे. या वर्षी घोडे बाजारात तीन हजार पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या किमती दोन कोटींपर्यत असतील असे अश्व जाणकार सांगतात. जर तुम्हालाही असे रुबाबदार, देखणे घोडे पाहायचे असतील, त या घोडेबाजाराला जरूर भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.