Viral Video: संसदेत राडा! 'जय हिंदू राष्ट्र...' म्हणत भाजप खासदाराने संपवली शपथ, पाहा व्हिडिओ

Chhatrapal Singh Gangwar: 18 व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी सोहळा सोमवारपासून सुरू झाला आहे.
Chhatrapal Singh Gangwar BJP MP
Chhatrapal Singh Gangwar BJP MPEsakal
Updated on

18 व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी सोहळा सोमवारपासून सुरू झाला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील बरेली येथील भाजप खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंदू राष्ट्र, जय भारत’चा नारा दिला. यानंतर संसदेत गदारोळ झाला. त्यांच्या शपथेवर विरोधकांनी आक्षेप घेतला.

Chhatrapal Singh Gangwar BJP MP
CJI Chandrachud : 'या' चार वकिलांनी न्यायाधीश होण्यास दिला होता नकार; चंद्रचूड यांची ऑफर का फेटाळली? 'जज'पेक्षा जास्त प्रसिद्ध असलेले वकील...

बरेली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी मंगळवारी संसदेत शपथ घेताना 'जय हिंदू राष्ट्र'चा नारा दिला. खासदारांनी हिंदु राष्ट्राचा जयघोष करताच विरोधकांनी हल्लाबोल केला.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संविधानाच्या प्रती घेऊन सभागृहात बसून याला घटनाविरोधी म्हटले आहे. व्हिडिओमध्ये ते असे म्हणताना ऐकू येत आहे की, "हे संविधानविरोधी आहे...हे संविधानविरोधी आहे."

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप संविधान बदलणार असा आरोप केला होता. या मुद्द्यावर भाजपला यूपीसारख्या बालेकिल्ल्यात मोठे नुकसान सहन करावे लागले. आणि आता 18 व्या लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले असून, खासदारांच्या शपथविधीवेळी हिंदु राष्ट्राचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. ज्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत.

Chhatrapal Singh Gangwar BJP MP
Bihar Govt : बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकारच्या काळातील ८२६ कोटींची कंत्राटे रद्द; नेमकं कारण काय?

विशेष म्हणजे शपथविधीच्या वेळीही विरोधी पक्षाचे खासदार संविधानाची प्रत घेऊन संसदेत पोहोचले. इंडिया आघाडीचे खासदार हातात संविधानाचे पुस्तक घेऊन शपथ घेत आहेत आणि त्याच दरम्यान भाजपचे बरेलीचे खासदार छत्रपाल गंगवार यांनी आपल्या खास शैलीत शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंदू राष्ट्र’चा नारा दिला आहे.

दुसरीकडे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनची घोषणा केली आहे.

दरम्यान दोन्ही खासदारांचे व्हिडिओ व्हायरल होत असून लोक दोघांचाही निषेध करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.