Kawardha Accident : पिकअप वाहन खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर २५ जण जखमी

Kawardha Accident : छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप वाहन उलटून झालेल्या अपघातात १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
Kawardha Accident
Kawardha AccidentEsakal
Updated on

छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप वाहन उलटून झालेल्या अपघातात १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० महिलांचा समावेश आहे. बैगा आदिवासी समाजातील २५ ते ३० लोकांचा एक गट तेंदूपत्ता गोळा करून पिकअप वाहनामधून परतत होता. दरम्यान बहपनी परिसरात त्यांचे वाहन २० फूट खोल खड्ड्यात पडून हा अपघात झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व कुई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या भीषण अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. पिकअपमध्ये २५ हून अधिक लोक होते. कुकदूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमध्ये बसलेले लोक सेमहरा (कुई) गावचे रहिवासी असून ते तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते.

हा अपघात झाला तो रस्ता प्रधानमंत्री रोड अंतर्गत येतो. ते कुई मार्गे न्यूर आणि रुक्मिदादरला जोडते. यानंतर मध्य प्रदेश सुरू होतो. घटनास्थळ दुर्गम जंगलात आणि डोंगराळ भागात येते. मोबाईल नेटवर्क देखील येथे काम करत नाही.

Kawardha Accident
Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री साई म्हणाले की, कबीरधाम जिल्ह्यातील कुकदूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहपनी गावाजवळ पिकअप उलटल्याने १८ ग्रामस्थांचा मृत्यू आणि ७ ते ८ जण जखमी झाल्याची दुःखद बातमी मिळत आहे. जखमींवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अपघतातील आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

Kawardha Accident
Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

पिकअपमध्ये 25 पेक्षा जास्त जण करत होते प्रवास

एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, पिकअप वाहन कुकडूर पोलिस स्टेशन हद्दीतील बहपनी गावाजवळ खड्ड्यात पडले आहे. पिकअपमध्ये सुमारे 25 जण तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. हा अपघात झाला तेव्हा सर्वजण घरी परतत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जंगल आणि डोंगराळ भाग असलेल्या घटनास्थळी मोबाईल नेटवर्क काम करत नाही. घटनास्थळापासून कुकडूर तहसील मुख्यालय सुमारे 35 किमी अंतरावर आहे.

Kawardha Accident
Arvind Kejriwal News : केजरीवालांना ठार मारण्याची धमकी! मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवरून 'आप' नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.