Chhattisgarh Assembly Election: छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपा समान जागांवर; जाणून घ्या कोण पुढे कोण मागे?

Chhattisgarh Assembly Election result: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरूवातीला सगळ्या जागांचे ट्रेंड आले आहेत.
Chhattisgarh Assembly Election
Chhattisgarh Assembly ElectionEsakal
Updated on

Chhattisgarh Assembly Election result: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरूवातीला सगळ्या जागांचे ट्रेंड आले आहेत. भाजप 44 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 45 जागांवर आघाडीवर आहे. एकीकडे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे भाजपही सरकार स्थापनेची चर्चा करत आहे. मात्र, एक्झिट पोलचे निकाल काँग्रेसच्या बाजूने दिसत होते.

सर्वेक्षणात काँग्रेसला 40 ते 50 तर भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. म्हणजे छत्तीसगडची जनता भूपेश बघेल यांच्यावर विश्वास व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, गेल्या वेळेपेक्षा भाजपची कामगिरी चांगली होताना दिसत आहे.

'या' जागांवर भाजपने घेतली आघाडी

छत्तीसगडमध्ये ज्या जागांवर भाजप आघाडीवर आहे त्यामध्ये भरतपूर सोनहट, प्रतापपूर, रामानुजगंज, सामरी, लुंध्रा, प्रेमनगर, बैकुंठपूर, महेंद्रगढ, काठघोरा, मस्तुरी, पामगढ, बिल्हा, लोर्मी, पंडारिया, साजा, अरंग, रायपूर ग्रामीण, पटरीया, अरंग, रायपूर ग्रामीण संजरी बालोद, सिहावा, कल्लारी आणि जगदलपूर.

Chhattisgarh Assembly Election
Telangana Results 2023 : तेलंगणामध्ये काँग्रेसने जिंकल्या ६४ जागा; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

रायपूर पश्चिममधून भाजपचे राजेश मुनत 1039 मतांन पुढे, रायपूर दक्षिणमधून ब्रिजमोहन अग्रवाल 1500 मतांनी पुढे, लुंद्रा विधानसभेतून प्रबोध मिंज 2882 मतांनी पुढे, अंबिकापूरमधून टीएस सिंगदेव 650 मतांनी पुढे आहेत.

अमरजीत भगत हे एस. 585 मतांनी पुढे, कोरबा विधानसभेतून पहिल्या फेरीनंतर, कोरबा आमदार आणि महसूल मंत्री जयसिंग अग्रवाल 900 मतांनी मागे, भाजपचे उमेदवार लखन लाल दिवांगन पुढे, बिलासपूरमध्ये माजी मंत्री अमर अग्रवाल बिलासपूर विधानसभेत 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Assembly Election
Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

कोरबा जिल्ह्यात टपाल पत्रांची मोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोरबा विधानसभेतून काँग्रेस 2778 मतांनी, भाजप 2896 मतांनी, भाजपचे लखनलाल दिवांगन 118 मतांनी आघाडीवर आहेत. रामपूर विधानसभेतून काँग्रेस 3578, भाजप 2788, काँग्रेसचे फूलसिंग राठिया 790 मतांनी पुढे आहेत. काटघोरा विधानसभेत काँग्रेस 543 ने पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.