रायपूर- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी भाच्चा आणि भाजप नेते विजय बघेल यांचा पराभव केला आहे. भूपेश बघेल यांनी विजय बघेल यांच्यावर १९,७२३ मतांनी विजय प्राप्त केल आहे. ( Chhattisgarh Assembly Election result 2023 bhupesh baghel win from patan constituency but lost cm post)
सुरुवातीच्या कलांमध्ये बघेल यांची पिछाडी झाली होती. पण, दुपारनंतर त्यांनी आघाडी घेतली आहे, ती कामय ठेवली. भूपेश बघेल विजयी झाले असले तरी राज्य त्यांच्या हातातून गेलं आहे. शिवाय त्यांना मुख्यमंत्रीपदापासूनही दूर व्हावं लागणार आहे. छत्तीसगडमध्ये भाजपने बहुमत प्राप्त केल आहे. तर काँग्रेसला अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागला आहे.
एक्झिट पोलनुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, ही शक्यता फोल ठरली आहे. शिवाय भूपेश बघेल यांनी राज्यात ७५ जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. पण, त्यांना धक्का बसला आहे. रात्री आठपर्यंत मिळालेल्या निकालानुसार, भाजप ५५ जागांवर आघाडीवर होती. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर होती.
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता होती. भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल हे स्पष्ट आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून भाजप कोणत्या चेहऱ्याला संधी देतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.