Chhattisgarh Assembly Result 2023: छत्तीसगडचे भाजपचे व्हीआयपी उमेदवार ब्रिजमोहन अग्रवाल यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. ते रायपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचा अभेद्य किल्ला म्हणून ओळखली जाणारी ही जागा हायप्रोफाईल जागांपैकी एक आहे. याठीकाणी ब्रिजमोहन अग्रवाल यांचा सामना प्राचीन दुधाधारी मठाचे महंत रामसुंदर दास यांच्याशी होणार आहे. बृजमोहन अग्रवाल महंत राम सुंदर दास यांना आपले गुरू मानत असल्याने यंदा या जागेवरील लढत अतिशय रंजक मानली जात आहे.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायपूर दक्षिण विधानसभा जागेवरून काँग्रेसने महंत राम सुंदर दास यांना तिकीट दिले होते, ते भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांच्या विरोधात लढत आहेत.
भाजपचे दिग्गज नेते ब्रिजमोहन अग्रवाल हे नेहमीच दक्षिण रायपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत आले आहेत. काँग्रेसने महंत रामसुंदर दास यांना उमेदवारी दिल्यामुळे ही लढत रंजक बनली होती. महंत रामसुंदर दास यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध असला तरी संत समाजात त्यांचा आदर आहे. भाजप आणि काँग्रेससह सर्व पक्षांचे लोक त्यांचा आदर करतात. त्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवेश हा ब्रिजमोहन अग्रवाल यांच्यासाठीही चिंतेचा विषय मानला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोण आहेत महंत रामसुंदर?
महंत रामसुंदर हे काँग्रेसचे आमदार असताना काँग्रेस सरकारने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. ब्रिजमोहन अग्रवाल हे 35 वर्षांपासून दक्षिणचे आमदार आहेत. महंत रामसुंदर दास हे रायपूर शहरातील सर्वात जुने दूधधारी मठाचे प्रमुख आहेत. सध्या ते छत्तीसगड राज्य गाय सेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. 2001-2003 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात ते संस्कृत बोर्डाचे पहिले अध्यक्ष बनले. याशिवाय ते छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्यही राहिले आहेत. (Latest Marathi News)
साहित्य आचार्य ही पदवी मिळाल्यानंतर महंत रामसुंदर दास यांनी ‘रामायण काळातील ऋषी-मुनींचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर पीएचडीही केली आहे. 2003 मध्ये महंत राम सुंदर दास यांनी पमगढमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्यानंतर 2008 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जैजेपूरमधून निवडणूक लढवून विजय मिळवला. 2013 च्या निवडणुकीत त्यांना जैजेपूरमधून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.