सहदेव दिरदोचा अपघात झाला असून त्याची प्रकृत्ती गंभीर असल्याची माहिती प्रसिद्ध रॅपर बादशाहनं दिली होती.
'जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार' (Bachpan Ka Pyar) हे गाणं गाऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेला सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) हा बालक मंगळवारी रस्ता अपघातात जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांनी सहदेव लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरू केली. छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनीही सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, आता सहदेवची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.
अपघातानंतर काही तासांनी सहदेवला रात्री 10 वाजता शुद्ध आली. त्याची प्रकृती सुधारत असली, तरी त्याला थोडा वेळ लागेल. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. सध्या सहदेवची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटनेच्या वेळेपासून ते उपचार होईपर्यंत सहदेव सुमारे 5 तास बेशुद्ध अवस्थेत होता.
बॉलिवूड गायक बादशाहनं सहदेव लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केलीय. त्यानं फोनवरून सहदेवच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. बादशाह आणि सहदेवनं मिळून 'बचपन का प्यार' या गाण्यावर व्हिडिओ गाणं बनवलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळची आहे. सहदेव हा मित्रांसोबत दुचाकीवरून शबरी नगरला जात होता. यादरम्यान त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला चार टाकेही पडले आहेत.
सहदेव दिरदोनं 'जाने मेरी जानेमन' हे गाणं अशा प्रकारं गायलंय, की ते खूपच व्हायरल झालं. सहदेवच्या शाळेतील शिक्षकानं 2019 मध्ये त्याच्या वर्गात बचपन का प्यार हे गाणं गातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. निळा शर्ट घातलेला सहदेव थेट कॅमेऱ्यात दिसतो आणि गाणं म्हणतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही सहदेवला पुष्पहार अर्पण करून त्याचा सन्मान केलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.