PM मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी

पीएम मोदींच्या सभेसाठी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जाणारी बस ट्रेलरला धडकली
Accident news
Accident newsEsakal
Updated on

छत्तीसगडमधील बेलतरा येथे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अंबिकापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जाणारी बस एका ट्रेलरला धडकली, ज्यात दोन जण ठार तर 6 जखमी झाले आहेत. ही बस पंतप्रधान मोदींच्या सभेत सहभागी होण्यासाठी जात होते. या बसमध्ये भाजपचे एकूण 40 कार्यकर्ते होते. जखमींना उपचारांसाठी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.(Latest Marathi News)

पंतप्रधानांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी सर्व लोक अंबिकापूरहून रायपूरला जात होते. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या बहुतांश भागाचा चुराडा झाला आहे. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने बसमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. (Marathi Tajya Batmya)

Accident news
Viral Video : भाड्याच्या पैशावरून वाद! क्रूर रिक्षावाल्याने महिलेला नेलं फरफटत; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

आज पंतप्रधान मोदी रायपूरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. रॅलीपूर्वी पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'उद्या रायपूरमध्ये छत्तीसगड भाजपच्या रॅलीत जनतेशी संवाद करण्यासाछी मी खूप उत्सुक आहे. छत्तीसगडच्या जनतेचे भाजपशी नेहमीच घट्ट नाते राहिले आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव कायम राहतील याची मला खात्री आहे'.(Latest Marathi News)

Accident news
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धीवर तीन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास अटक

पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 75 लाख कार्ड वितरणाचे उद्घाटन करतील आणि अंतागढ़ (कांकेर जिल्हा) ते रायपूर या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर पंतप्रधान त्याच ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करतील. (Marathi Tajya Batmya)

Accident news
Buldhana Bus Accident : दारूने घेतला २५ निष्पापांचा बळी? बुलढाणा अपघातात मोठी अपडेट आली समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.