Chhattisgarh Election : ''सत्तेत परतल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी'', छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडून आश्वासनांची खैरात

congress sonia gandhi rahul gandhi
congress sonia gandhi rahul gandhiesakal
Updated on

रायपूरः शेतकरी सुखी तर देश सुखी, असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी रविवारी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी, कृषीसाहित्य खरेदीसाठी अनुदान यासह शेतकरी हिताच्या पाच योजना राबविण्याचं आश्वासन दिलं.

राहुल यांनी रायपूर जवळील काथिया गावाला भेट देत येथील शेतकरी आणि मजुरांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे त्यांनी येथील शेतकऱ्यांबरोबर भातलावणीदेखील केली. यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे देखील बरोबर होते.

congress sonia gandhi rahul gandhi
Rajsthan Election: राजस्थानच्या या भागात 'जात आणि घराणेशाही'चं वर्चस्व, सत्तेचा खेळ या ठिकाणी कसा बदलतो जाणून घ्या

बघेल यांचे सरकार भ्रष्ट- नड्डा

‘‘छत्तीसगडमधील बघेल यांचे सरकार भ्रष्ट असून काँग्रेसला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही’’ असा आरोप भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रविवारी रायपूर ग्रामीण मधील अमलीडीह येथील ‘बूथ विजय संकल्प अभियाना’त बोलताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमानंतर येथे उपस्थित कार्यकर्त्यांना नड्डा यांनी संबोधित केले.

‘‘बघेल यांच्या सारखे भ्रष्ट आणि नाकर्ते सरकार पाहिले नाही, इथे थेट मुख्यमंत्र्यांचा सचिवच वर्षभर तुरुंगात आहे. ही बाब आश्‍चर्यकारक आहे’’ असे म्हणत नड्डा यांनी बघेल सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री कार्यालयातील सौम्या चौरसिया या सचिव मागील वर्षीच्या डिसेंबर पासून तुरुंगात आहेत. अर्थिकगैरव्यवहार प्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने त्यांना अटक केली होती. त्याचा संदर्भ देत नड्डा यांनी बघेल सरकारवर टीका केली.

congress sonia gandhi rahul gandhi
Google Bharat : आता गुगल मॅप्सवर 'इंडिया' सोबत दिसतंय 'भारत' नाव; इतर सेवांमध्येही जोडली दोन्ही नावं

नोटाचा पर्याय रद्द करा- बघेल

मतदारानांना देण्यात आलेला नोटा (वरील पैकी कोणीही उमेदवार नाही) हा पर्याय रद्द करण्यात यावा. कित्येकदा विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील फरकापेक्षा नोटाला मिळालेली मते अधिक असतात, असा दावा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. रविवारी रायपूर येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बघेल यांनी हे मत व्यक्त केले आहे.

मागील निवडणुकी दरम्यान, नोटाला दोन लाख लोकांनी पसंती दिली होती, त्यामुळे नोटाचा निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम होईल? या प्रश्‍नाला उत्तर देताना बघेल म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी आणि हा पर्याय रद्द करायला हवा.’’ ‘‘अनेक मतदारांना दुसरे बटण दाबायचे असते परंतु त्यांच्याकडून अनावधानाने ‘नोटा’चे बटण दाबले जाते’’ असा दावाही बघेल यांनी यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.