Chhattisgarh: मतदानाच्या एक दिवस आधी घातपात! IED बॉम्बच्या स्फोटामुळे बीएसफ कर्मचाऱ्यासह दोघे जखमी

Chhattisgarh
Chhattisgarh
Updated on

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये आयईडी बॉम्बच्या स्फोटामुळे बीएसफचा हवालदार गंभीर जखमी झाला आहे. तसेच दोन पोलिंग प्रतिनिधी किरकोळ जखमी झाले आहेत. छत्तीसगडच्या कानकेरमधील ही घटना आहे. छत्तीसगडमध्ये उद्या पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नक्षलवाद्यांचा राज्यातील प्रभाव पाहता राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

बीएसफ हवालदार प्रकाश चंद यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे. बीएसफ आणि जिल्हा सुरक्षादल चार पोलिंग प्रतिनिधींचा घेऊन मारबेडा कॅम्पमधून रंगाघाटी रंगागोदी पोलिंग स्टेशनकडे जात होते. त्यावेळी आयईडी बॉम्बचा स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिलीये.

Chhattisgarh
Chattisgarh Vidhansabha : छत्तीसगड मध्ये काँग्रेसच टेन्शन वाढलं; आमदाराने उभारला बंडाचा झेंडा

छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यामध्ये निवडणुका पार पडणार आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.