Chhattisgarh Election Results: छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेजवळ; मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहेत प्रबळ दावेदार?

छत्तीसगडमधील निवडणुकांचे (Chhattisgarh Election) निकाल स्पष्ट होत आहेत. कलांनुसार, राज्यात भाजपने बहुमतांच्या आकड्यांच्या पुढे मुसंडी मारली आहे.
Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेजवळ; मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहेत प्रबळ दावेदार?
Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेजवळ; मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहेत प्रबळ दावेदार?eSakal
Updated on

Leaders in CM Race CG: रायपूर- छत्तीसगडमधील निवडणुकांचे (Chhattisgarh Election) निकाल स्पष्ट होत आहेत. कलांनुसार, राज्यात भाजपने बहुमतांच्या आकड्याच्या पुढे मुसंडी मारली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chief Minister Bhupesh Baghel) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, छत्तीसगडमध्ये पु्न्हा काँग्रेस सरकार सत्तेत येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, कलांनुसार, भाजपला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होतंय. (Chhattisgarh Election Results 2023 BJP surges ahead Cong trails Chief Minister Bhupesh Baghel raman singh)

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेजवळ; मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहेत प्रबळ दावेदार?
Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

छत्तीसगडमध्ये भाजपने सरकार स्थापन केल्यास मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला संधी मिळेल? असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपने सत्ता स्थापन केल्यास माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव, खासदार विजय बघेल आणि माजी आयएएस अधिकारी ओपी चौधरी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

छत्तीसगडमध्ये भाजपकडे चार मोठे चेहरे आहेत. यात माजी मुख्यमंत्री रमण सिंह, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सरोज पांडेय, माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांचे नाव येते. ओबीसीचा चेहरा म्हणून बिलासपूरचे खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साव, माजी विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक, खासदार विजय बघेल,विरोधी पक्षनेता नारायण चंदेल, माजी मंत्री अजय चंद्राकर, युवा नेते ओपी चौधरी या नेत्यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते.

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेजवळ; मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहेत प्रबळ दावेदार?
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल हाती; दिवसभरात कशी होती राजकीय रस्सीखेच वाचा एका क्लिकवर

एसटी समाज

छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री करण्याची मागणी अनेकदा होत आली आहे. अशात अनुसूचित जमाती वर्गातून राज्यातील केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह, माजी राज्यसभा सदस्य रामविचार नेताम, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साय, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लता उसेंडी आणि युवा नेता आणि माजी मंत्री केदार कश्यप यांचं नाव समोर येऊ शकते.

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेजवळ; मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहेत प्रबळ दावेदार?
Assembly Election Result Updates : विविध ठिकाणी वेगवेगळे आकडे पाहून गोंधळ उडतोय? असे पाहा निवडणूक निकालांचे अचूक अपडेट्स

एससी समाज

अनुसूचित जाती वर्गामधून पक्षाकडे जास्त पर्याय नाहीत. माजी मंत्री कृष्णमूर्ती बांधी, माजी मंत्री पुन्नुलाल मोहिले यांचे नाव चर्चेत आहे. भाजपने नि़वडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. सामूहिक नेतृत्त्वात निवडणूक लढवली जाईल असं भाजपने स्पष्ट केलं होतं.मागीलवेळी माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.