Bhupesh Baghel : भूपेश बघेल यांची प्रतिष्ठा पणाला; छत्तीसगडमधील लक्षवेधी लढत

Lok Sabha 2024 : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल पुन्हा नव्या दमाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजनांदगाव या मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत.
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024eSakal
Updated on

Chhattisgarh Lok Sabha 2024 : काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल पुन्हा नव्या दमाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजनांदगाव या मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. ही निवडणूक त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारी ठरू शकते. विजय मिळाल्यास त्यांची राज्यातील तसेच दिल्लीच्या राजकारणातसुद्धा उंची वाढण्यास मदत होणार आहे.

छत्तीसगडमधील कवर्धा व राजनांदगाव अशा दोन जिल्ह्यांमध्ये हा मतदारसंघ पसरलेला आहे. या मतदारसंघातील ८५ टक्के भाग ग्रामीण आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या मतांवर या मतदारसंघाचे निकाल हेलकावे खात असतात. भाजप व काँग्रेसला या मतदारसंघात एकहाती वर्चस्व राखता आलेले नाही. हे खरे असले तरी गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपने या मतदारसंघात विजय संपादन केला आहे. यावर्षी पहिल्यांदाच भाजपने संतोष पांडे या विद्यमान खासदाराला पुन्हा उमेदवारी दिली आहे.

गेल्या १५ वर्षांपासून भाजपने या मतदारसंघावर वरचष्मा कायम राखला असला तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात फारसे यश मिळू शकले नाही. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते. या मतदारसंघात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ तीन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले तर उर्वरित पाच मतदारसंघांमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. यामुळे काँग्रेसला जनाधार नाही, असे म्हणता येणार नाही. तसेच गेल्या तीन निवडणुकांच्या निकालातील मतांचे अंतर पाहिले तर फार नाही. थोड्या मतांची फेरफारही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चीतपट करू शकते. म्हणूनच बघेल यांनी हा काँग्रेससाठी काहीसा सकारात्मक असलेला मतदारसंघ निवडला असावा.

Lok Sabha 2024
राज्य-मिती : ‘हिंदी पट्ट्यात’ मोदींची जादू कायम; मध्य प्रदेशात काय स्थिती?

भाजपने संतोष पांडे यांना दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यास सांगितले आहे. हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांचा आहे. राजनांदगाव या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून गेलेले आहेत. याचा फायदाही भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतो. ही निवडणूक संतोष पांडे यांच्यापेक्षा भूपेश बघेल आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे, हे निश्‍चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.