शेवटी आई ती आईच! लेकीसाठी रानडुकराशी अर्धा तास लढली, पण....

आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी कायम तयार असते.
Chattisgarh woman fights with wild boar
Chattisgarh woman fights with wild boarSakal
Updated on

Mother love viral video: आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटासाठी लढायला तयार असते. याची अनेक उदाहरणं आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पाहिली असतील. पण एका आईने आपल्या लेकीसाठी थेट जीवाची बाजी लावली आहे.

छत्तीसगडमधल्या कोरबा जिल्ह्यात एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या ११ वर्षीय मुलीला वाचवण्यासाठी थेट रानडुकराशी झुंज केली. पण तिची ही झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. कोरबा जिल्ह्यातल्या पासन वन परिक्षेत्रामधल्या तेलियामार गावात ही घटना घडली आहे.

Chattisgarh woman fights with wild boar
Shashi Tharoor English : Meme झाले खरे! शशी थरुरांच्या कार्यक्रमात तरुण थेट डिक्शनरीच घेऊन पोहोचला...

दुवसिया बाई आणि तिची मुलगी रिंकी असे या महिलेचे नाव असून ते शेतात कामावर गेले असता रानडुकराने रिंकीवर हल्ला केला. हे पाहून दुवसियाबाईंनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुलीला वाचवले आणि रानडुकराशी सामना केला. हा संघर्ष सुमारे अर्धा तास चालला.

दुर्दैवाने या लढाईत दुवसियाबाईंना आपला जीव गमवावा लागला पण तिने आपल्या मुलीला या हल्ल्यातून वाचवत रानडुकरालाही मारले. जखमी झालेल्या रिंकीने गावाकडे धाव घेत सर्वांना माहिती दिली. काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले, त्यानंतर वनविभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि कारवाई केली. रिंकीला पळसन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()