Modi Government News : एनएसए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) यांच्या धर्तीवर भारत सरकार चीफ इन्वेस्टिगेशन ऑफिसर (सीआयओ) हे पद निर्माण करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
सीआयओ तैनात केल्यास ते सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख म्हणून काम करतील, असे म्हटले जात आहे.
सीबीआय आणि ईडी मध्ये समन्वयासाठी चीफ इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर पद आणण्याच्या विचारात मोदी सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, देशात सीआयओ ची नियुक्ती झाल्यास ईडी आणि सीबीआय त्यांना रिपोर्ट करतील.
विशेष म्हणजे लष्कराच्या तिन्ही दलांचे टॉप सीडीएस असतात आणि दोन्ही गुप्तचर यंत्रणा एनएसएला रिपोर्ट करतात. यादरम्यान सध्या सीआयओ पदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
सध्या ईडी प्रामुख्याने आर्थिक फसवणुकीची प्रकरणे हाताळते. याशिवाय मनी लॉन्ड्रिंग आणि फेमा अर्थात फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टचे उल्लंघन अशा प्रकरणांमध्येही केंद्रीय एजन्सी कारवाई करते. तर भ्रष्टाचार आणि इतर आर्थिक गुन्ह्यांविरोधात आणखी एक केंद्रीय एजन्सी सीबीआय कार्यरत आहे.
सीआयओ चे काम काय असेल?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे पद भारत सरकारमध्ये सचिव दर्जाचे असेल. त्यानंतरही ईडी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा महसूल विभाग आणि सीबीआय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या अखत्यारित काम करत राहील, असे म्हटले जात आहे. मात्र, हे सीआयओ द्वारे ऑपरेट केले जाऊ शकतात, जे थेट पंतप्रधान कार्यालयास रिपोर्ट करतील.
या पदाबाबत किंवा पहिल्या अधिकाऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु सध्याचे ईडी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना पहिले सीआयओ बनवले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांना १५ सप्टेंबरपर्यंत ईडीच्या प्रमुखपदी राहण्याची परवानगी दिली होती.
विशेष म्हणजे त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांची निवृत्तीनंतरची दोन वेळा केलेली मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली होती.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.