DY Chandrachud : जातीबाहेर लग्न केल्यामुळं दरवर्षी शेकडो मारले जातात; आंतरजातीय विवाहावर सरन्यायाधीशांचं मोठं भाष्य

उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांनी लग्नासाठी धार्मिक धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदे आणले आहेत.
Chief Justice CJI DY Chandrachud
Chief Justice CJI DY Chandrachudesakal
Updated on
Summary

उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांनी लग्नासाठी धार्मिक धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदे आणले आहेत.

आपल्या जातीबाहेर लग्न केल्यामुळं देशात दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. कुटुंबाविरुद्ध लग्न केल्यामुळं त्यांची हत्या केली जाते. उत्तर प्रदेशमध्ये 1991 मध्ये झालेल्या ऑनर किलिंगच्या (Honor killing) घटनेचा संदर्भ देत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice (CJI) DY Chandrachud) यांनी हे विधान केलंय.

'टाईम' या अमेरिकन नियतकालिकातील एका लेखात उत्तर प्रदेशातील 15 वर्षांच्या मुलीवर तिच्या खालच्या जातीतील एका 20 वर्षांच्या मुलासोबत पळून गेल्याबाबतचं वृत्त आहे. नंतर गावातील उच्चवर्णीय लोकांनी त्यांची हत्या केली. हत्या करणाऱ्या लोकांनी समाजाच्या आदर्शांचं पालन केलं आणि ते योग्य होतं, असं गावकरी सांगतात.

Chief Justice CJI DY Chandrachud
DY Chandrachud : आमच्यासाठी कोणतीही गोष्ट लहान-मोठी नसते; सरन्यायाधीशांचा कायदा मंत्र्यांना टोला

नैतिकतेबद्दल बोलताना चंद्रचूड म्हणाले, 'रोजच्या संभाषणात चांगले-वाईट, बरोबर आणि चुकीचे शब्द वापरले जातात. जिथं कायदा बाह्य संबंधांवर नियंत्रण ठेवतो, नैतिकता आंतरिक जीवन आणि प्रेरणा नियंत्रित करते. नैतिकता आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला आकर्षित करते आणि अनेकदा आपल्या वागण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकत असते.'

Chief Justice CJI DY Chandrachud
Kiren Rijiju : भारत-चीन वाद सुरु असतानाच कायदामंत्र्यांनी शेअर केला 'तो' जुना फोटो; काँग्रेसनं केली पोलखोल

नैतिकता ही मूल्यांची एक प्रणाली आहे, जी आचारसंहिता मांडते. पण, नैतिकता म्हणजे काय? यावर आपण सर्वजण सहमत आहोत का? माझ्यासाठी जे नैतिक आहे, ते तुमच्यासाठीही नैतिक असणं आवश्यक आहे का? असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील अशोक देसाई स्मारक इथं 'नैतिकता' म्हणजे काय? यावर चर्चा करताना चंद्रचूड पुढं म्हणाले, समाजाच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय संदर्भात पारंपारिकपणे सत्तेची पदं भूषविणाऱ्या गटांना पुरेशी नैतिकता पोहोचवणं आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Chief Justice CJI DY Chandrachud
Pune Police : गृहमंत्री अमित शहा, चंद्रकांत पाटलांवर आक्षेपार्ह टिप्पणी; कन्नडच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

चंद्रचूड यांचं विधान अशा वेळी आलंय, जेव्हा उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह अनेक राज्यांनी लग्नासाठी धार्मिक धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदे आणले आहेत. त्याला "लव्ह जिहाद" कायदे म्हणून संबोधलं जात आहे. या कायद्यांवर अनेक गट आणि तज्ञांनी टीका केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.