दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 156 दिवस घालवल्यानंतर केजरीवाल पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
केजरीवाल यांना जामीन देण्यासोबतच त्यांची अटक चुकीची नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईंया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
न्यायालयाने म्हटले की, आरोपपत्र दाखल झाले आहे आणि खटला लवकर पूर्ण होणार नाही, त्यामुळे त्यांंना जास्त काळ तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही. केजरीवाल यांना 10 लाख रुपयांचा जामीन मुचलका भरावा लागणार आहे.