Eknath Shinde At Gujrat : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुजरातला झाले रवाना : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार महत्त्वाची बैठक !

Eknath Shinde At Gujrat : गांधीनगर येथे क्षेत्रीय परिषदेचे आयोजन
EKnath Shinde Devendra Fadnavis Amit Shah
EKnath Shinde Devendra Fadnavis Amit ShahSakal
Updated on

Eknath Shinde At Gujrat | राज्याच्या राजकीय वर्तुळातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले असून त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गुजरातला रवाना झाले आहेत. अशी माहीती 'साम' वृत्त वाहिनीने प्रकशित केली आहे.

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणी दौऱ्यावर होते. त्यानंतर ते लगेचच गुजरातला रवाना झाल्याचे वृत्त समोर आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्या मागचे नक्की कारण काय हे समजू शकले नव्हते.

EKnath Shinde Devendra Fadnavis Amit Shah
Ekanath Shinde आणि Devendra Fadnavis यांनी Delhi दौरा का केला?

मात्र आता याबाबतची माहिती समोर आली आहे ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातच्या गांधीनगर येथे क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शारीरिक शोषण आणि अत्याचार या प्रकरणाच्या तात्काळ चौकशी बाबत चर्चा होणार आहे

EKnath Shinde Devendra Fadnavis Amit Shah
CM Eknath Shinde:परभणी दौऱ्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट गुजरातला रवाना, कारण अद्याप अस्पष्ट

याचबरोबर पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संदर्भात विषयांवर चर्चा होणार आहे. याचबरोबर शेजारी राज्यात परस्पर सहयोग निर्माण करण्याविषयी चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रा सह इतर राज्याचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागतील असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.