Chief Minister Himanta Biswa Sarma : आसाममध्ये ‘जाणता राजा’ करणार

आसाममध्ये वैद्यकीय सुविधा अत्यंत चांगल्या असून सरकारी रुग्णालये जनतेच्या
asam
asam sakal
Updated on

गुवाहाटी- "छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मुघलांच्या आक्रमणापासून जनतेचे रक्षण केले, त्याच प्रमाणे आसाममध्येही लासिथ बोडफुकन यांनी मुघलांना पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचे कार्य भव्य स्वरूपात लोकांसमोर आणण्यासाठी आणि ती भव्यता कशी असावी हे दाखविण्यासाठी आम्ही ''जाणता राजा''चे प्रयोग आसाममध्ये करणार आहोत,"

असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी आज सांगितले. प्रसिद्ध कामाख्या देवीचे मंदिर महाराष्ट्रातही उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रसूचना कार्यालयाने महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी आखलेल्या आसाम-मेघालय अभ्यास दौऱ्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी पत्रकारांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांची भेट घेतली. यावेळी सरमा यांनी आसाममधील विकास कामांची माहिती घेतली.

ते म्हणाले,"आसाममध्ये वैद्यकीय सुविधा अत्यंत चांगल्या असून सरकारी रुग्णालये जनतेच्या सेवेसाठी कायम सज्ज असतात. एकूण जीडीपीच्या सहा टक्के खर्च वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी केला जातो. याशिवाय पर्यटन क्षेत्रातही सहाशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. "

महाराष्ट्रात मागील वर्षी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे कामाख्या देवी मंदिराची राज्यात बरीच चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर सरमा यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामाख्या देवीवर श्रद्धा आहे. आम्ही महाराष्ट्रातही कामाख्या देवीचे मंदिर उभारण्याचा विचार करत असून त्यासाठी नवी मुंबईत जागाही शोधत आहोत.

asam
Mumbai : ब्लॉकचा आज शेवटचा दिवस ! आज ११० लोकल असणार रद्द !

शिंदे यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून मी एकदा मुंबईत जाऊन पाहणी करणार आहे. " छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या आक्रमणापासून महाराष्ट्राचे रक्षण केले. त्याच प्रमाणे आमच्याकडेही लासिथ बोडफुकन यांनी मुघलांचा अनेक वेळा पराभव केला आहे. मात्र त्यांच्या कार्याचा सर्व देशवासीयांना फारसा परिचय नाही. त्यामुळे आम्हाला ''जाणता राजा''प्रमाणेच नाटक करायचे आहे आणि त्यासाठीच या नाटकाचे प्रयोग आम्ही आसाममध्ये करणार आहोत, असेही सरमा यांनी सांगितले.

‘ईशान्य भारतात शांतच’

"ईशान्य भारतातील एखाद्या राज्यामध्ये संघर्ष निर्माण झाला तर, संपूर्ण ईशान्य भारत अशांत असतो, असे नाही. असा गैरसमज झाल्याने आमच्या राज्यांतील विकास कामांवर परिणाम होतो,"अशी खंत मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी व्यक्त केली. ईशान्येत एखाद्या राज्यातील थोडा संघर्ष वगळता आमचा भाग शांतच आहे, असे सरमा यांनी ठामपणे सांगितले.

asam
Mumbai : मोहित कंबोज याना न्यायालयाकडून दणका; फसवणुकीच्या गुन्ह्यात सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायलयाने फेटाळला

आरोग्यसेवेत सकारात्मक बदल

"वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत दहा वर्षांपूर्वीचा आसाम आणि आजचा आसाम यामध्ये मोठा फरक असून पुढील काही वर्षांत आणखी विकासात्मक बदल झालेला सर्वांना दिसेल,"असा विश्वास गुवाहाटीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) कार्यकारी संचालक अशोक पुराणिक यांनी आज व्यक्त केला. गुवाहाटीत ''एम्स'' सुरू झाल्याने ईशान्य भारतातील लोकांची मोठी सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातील पहिल्या ''एम्स''चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच वर्षी झाले.

पत्र सूचना कार्यालयाने आयोजित आसाम अभ्यास दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांनी या संस्थेला भेट देत कामकाजाची आणि राज्यातील आरोग्य स्थितीची माहिती घेतली. पुण्यातील ''एएफएमसी''मध्ये सात वर्षे काम केलेल्या पुराणिक यांनी आणि यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अभियान संचालक डॉ. लक्ष्मीप्रिया यांनी राज्यातील आरोग्य स्थितीची, त्यात होत असलेल्या सुधारणांची आणि वेगवेगळ्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली.

asam
Meri Maati Mera Desh: मोदींच्या संकल्पनेतील कार्यक्रमाला CM हजर पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; चर्चेला उधाण...

आसाममध्ये २००९ पर्यंत केवळ तीन वैद्यकीय महाविद्यालये आणि एक दंत महाविद्यालय होते, आता ही संख्या अनुक्रमे बारा आणि तीन झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गुवाहाटीतील ''एम्स''मध्ये आयुष्मान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचेही पुराणिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.