PM मोदींनी गांभिर्याने ऐकून घेतलं, आम्ही समाधानी- मुख्यमंत्री

PM मोदींनी गांभिर्याने ऐकून घेतलं, आम्ही समाधानी- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठा आरक्षणप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मोदींबरोबर चर्चा केली. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राचा हस्तक्षेप, राज्याला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करणे, जीएसटी थकबाकीची रक्कम राज्याला त्वरित देणे या ठळक मुद्यांचा चर्चेत समावेश करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं.

  • पंतप्रधानांसोबत व्यक्तिगत भेट झाली. या बैठकीत गैर असं काही नाही. आम्ही सत्तेत नसलो, तरी त्यांचं आणि माझं नातं जूनं आहे. सत्तेत नसलो म्हणजे नातं तुटलं असं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. मोदी आणि ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • लसीकरणाची राज्याने तयारी केली होती. सुरुवातही झाली होती. पण, पंतप्रधान मोदींनी काल लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. त्यांचे स्वागत. त्यांनी आता लवकरात लवकर महाराष्ट्रच नाही, तर सर्व राज्यांना लस लवकर पुरवावी- मुख्यमंत्री

  • -बैठकीत राजकीय अभिनिवेश नव्हता. बैठकीमुळे आम्ही समाधानी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत ज्याप्रकारे आमचं ऐकूण घेतलं. त्यामुळे असा विश्वास वाटतो की ते सर्व मागण्या पूर्ण करतील- मुख्यमंत्री

PM मोदींनी गांभिर्याने ऐकून घेतलं, आम्ही समाधानी- मुख्यमंत्री
PM मोदी आणि CM ठाकरे यांच्यात 10 मुद्यांवर चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले-

-एससी, एसटी ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी

-24 हजार 306 कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला लवकर मिळाला

- नैसर्गिक आपत्तीबाबत जुने निकष बदलण्याची मागणी केली

-पीक विम्यासाठी बीड पॅटर्न राबवण्यासाठी सरकारकडे मागणी केली

-महाराष्ट्रात पाच वर्षात 4 वेळा चक्रीवादळ आले. यामुळे किनाऱ्यातील जिल्ह्यांचे नुकसान झाले. पायाभूत सुविधांसाठी 5 हजार कोटी लागतात. ही मदत केंद्र सरकारने द्यावी

- कांजूरमार्ग येथील कारशेडबाबत चर्चा केली

- वादळग्रस्त नुकसान भरपाईसाठी असणाऱे 2015 चे नियम बदलावेत

- 14 व्या वित्त आयोगातील 1 हजार 444 कोटींची मदत तत्काळ मिळावी

-राज्यपालनियुक्त 12 आमदारांचा मुद्दा पंतप्रधानासमोर मांडला

मराठी आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांनी पुढील मुद्दे मांडले-

-सर्वोच्च न्यायलायने निर्णय दिलाय. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर निर्णय घेऊ शकते. केंद्राने 50 टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याची गरज आहे. तेव्हाच राज्य काही निर्णय घेऊ शकले. त्यामुळे केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा.

-मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातले महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.

-आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची मागणी मोदींकडे कली

-केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा, जेणेकरुन मराठा समाजाला न्याय मिळावा

- संविधानात दुरुस्ती करुन केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलावं

- महाविकास आघाडीने मराठा आरक्षणप्रकरणी सकारात्मक पाऊल उचलेले आहे, आता केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे

पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी आलो होतो. ही भेट अधिकृत होती, येण्याचं कारण हे राज्याचं प्रमुख विषयांसाठी भेट घेतली. मोदींशी व्यवस्थित चर्चा झाली. मोदींनी गांभिर्याने ऐकून घेतलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. मोदींसमोर पुढील मुद्दे मांडल्याचं ते म्हणाले

-मोदींकडून अपेक्षा आहे की, राज्याचे जे विषय मांडले ते सोडवतील. मराठा आरक्षणाचा विषयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

-पंतप्रधानांसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. इतर मागासवर्गीयांचे पंचायत राजमध्ये राजकीय आरक्षण हा देशाचा विषय आहे.

-जीएसटी परतावा वेळेवर मिळण्याबाबत चर्चा केली

-चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा तडाखा, अशावेळी मदतीचे निकष जुने झालेत त्यामध्ये बदल करण्याची गरज

-मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी

-14 व्या वित्त आयोगाची थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रॅंट

-मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण

  • पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास चाललेली बैठक संपली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात पोहोचले असून ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील. यावेळी ते काय बोलतील याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरु आहे. मोदी आणि ठाकरे यांच्या बैठकीचा एक फोटो बाहेर आला आहे. पंतप्रधान कार्यालयालाने हा फोटो शेअर केला असून अशोक चव्हाण आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित असल्याचं दिसतंय.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. मोदींच्या भेटीनंतर ते महाराष्ट्र सदनात जातील. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक सुरु झाली आहे. नियोजित वेळेनुसार 11 वाजून 5 मिनिटांनी ही बैठक सुरु झाली आहे. जवळपास अर्धातास ही बैठक होईल असं सांगितलं जातंय.

  • मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला जाताहेत, ही आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दाखवल्यास सर्व प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी आशा आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

  • गेल्या पंधरा मिनिटांपासून मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि अशोक चव्हाण हेही उपस्थित आहेत.

  • मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीचे स्वागत. देर आये दुरुस्त आहे. यातून काही तरी निष्पण होईल अशी आशा आहे. पण, मुख्यमंत्र्यांनी याआधीच भेट घ्यायला हवी होती. राज्य आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

  • मराठा समाजाचा मुद्दा जास्त ताणला जाऊ नये. अनेकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशामुळे महाराष्ट्राचे वातावरण गढूळ होऊ नये. आता निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे. सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यांना न्याय मिळायला हवा, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

  • मुख्यमंत्र्यांचा ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाला आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट होईल

  • उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भेटीची विनंती केली आहे. त्यामुळे परवानगी मिळाल्यास दोन्ही नेत्यांमध्ये 10 ते 15 मिनिटांची चर्चा होऊ शकते.

  • मुख्यमंत्र्यांचे विमान दिल्लीत दाखल झाले असून ते महाराष्ट्र मंडळात गेले आहेत. पंतप्रधान मोदींशी त्यांची 11 वाजता भेट नियोजित आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्र मंडळात येणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेत ते महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.