कर्नाटकात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार! भाजप बोम्मई सरकारवर नाराज?

राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नवीन मुख्यमंत्र्यांसाठी तरुण चेहऱ्याच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे
Chief Minister will change again In Karnataka
Chief Minister will change again In KarnatakaChief Minister will change again In Karnataka
Updated on

कर्नाटकात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलला जाऊ शकतो. भाजपचे (BJP) सर्वोच्च नेतृत्व पुन्हा एकदा राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याच्या विचारात आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षाला हा मोठा बदल करायचा आहे. काही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, राज्यातील सध्याच्या बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) सरकारच्या कामगिरीवर भाजप नेतृत्व नाराज आहे. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष व्यस्त असल्याने निवडणुकीच्या निकालानंतर काही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Chief Minister will change again In Karnataka)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या खराब कामगिरीमुळे (Poor performance) भाजप (BJP) नेतृत्व बोम्मई सरकारवर नाराज असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघ हनगलमध्ये पक्षालाच पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे पक्षाला २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची चिंता सतावत आहे. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारही सीएम बोम्मई यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Chief Minister will change again In Karnataka
नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘मला विचारून लफडा केला का?

राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नवीन मुख्यमंत्र्यांसाठी तरुण चेहऱ्याच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी पक्ष लिंगायत समाजातील मोठ्या चेहऱ्याच्या शोधात आहे. मात्र, पक्ष या पदासाठी दलित चेहऱ्याचीही निवड करू शकतो, असेही बोलले जात आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने (BJP) बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना मुख्यमंत्री केले होते. बोम्मई हे बीएस येडियुरप्पा (Yeddyurappa) यांच्या जवळचे होते आणि त्यांचे नाव खुद्द येडियुरप्पा यांनीच पक्षाच्या हायकमांडला सुचवले होते, असे त्या वेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.