तेलंगनणामधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये रक्षाबंधनासाठी भावाकडे निघालेल्या गरोदर महिलेची एसटी बसमध्येच डिलिव्हरी करावी लागली.
यामध्ये विशेष असे की, ही डिलिव्हरी करण्यासाठी बसच्या महिला कंडक्टरने पुढाकार घेतला आणि त्यानंतर बसमध्ये प्रवासी म्हणून असलेल्या नर्सने सर्व सूत्रे हाती घेतली आणि डिलिव्हरी यशस्वी केली. (Child Delivery In Bus In Telangana)
ही घटना तेलंगाणामधील गडवाल-वानपर्थी मार्गावर धावणाऱ्या सरकारी बसमध्ये घडली आहे.
दरम्यान बसमध्ये डिलिव्हरी करण्यात आलेल्या महिलेचे नाव संध्या असू असून, ती गडवाल या गावची रहिवासी आहे. रक्षाबंधनानिमित्त वानापर्थी या गावी राहत असलेल्या तिच्या भावाकडे जात होती. पण प्रवास सुरू असतानाच तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि महिला कंडक्टर आणि प्रवासी नर्सच्या मदतीने तिने बाळाला जन्म दिला.
दरम्यान सध्या सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत असून, बसच्या महिला कंडक्टर आणि प्रवासी नर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील महिलेने मुलीला जन्म दिला असून, पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान या घटनेनंतर TGSRTC च्या व्यवस्थापनाने नर्स आणि महिला कंडक्टरचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. TGSRTC च्या व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये TGSRTC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, "रक्षाबंधनाच्या दिवशी बसमधील गर्भवती महिलेच्या डिलिव्हरीसाठी तत्पर्य दाखवणाऱ्या कंडक्टर भारती यांचे TGSRTC च्या व्यवस्थापनाच्या वतीने अभिनंदन. भारतीय यांनी तत्परतेने आणि नर्सच्या मदतीने वेळेवर प्रसूती झाल्यामुळे आई आणि बाळ सुखरूप आहेत. प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवताना आरटीसी कर्मचारी सामाजिक जबाबदारी म्हणून सेवेची भावना दाखवत आहेत, ही मोठी गोष्ट आहे."
जूनमध्येही तेलंगणातील करीमनगर येथील बस स्थानकावर अशी घटना घडली होती. त्यावेळी एका महिलेने मुलाला जन्म दिला होता. रस्ते वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेची प्रसूती करून घेतली होती.
करीमनगरमध्ये त्यावेळी डिलिव्हरी झालेली महिला ओडिशाची रहिवासी होती. ती तेलंगणात मजुरीचे काम करायची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.