Child Pornography Case: चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे गुन्हा आहे का? हायकोर्टाने का मागे घेतला स्वत:च दिलेला आदेश

IT Act: "आम्हीही माणूस आहोत आणि आमच्याकडूनही चुका होतात. सुधारणेला नेहमीच वाव असतो. या संदर्भात चौकशी होऊन नवीन आदेश काढला जाईल त्यामुळे आधी दिलेला आदेश रद्द करण्यात आला आहे."
Child Pornography Case Karnataka High Court
Child Pornography Case Karnataka High CourtEsakal
Updated on

कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा IT कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नाही, असा आपला आदेश मागे घेतला आहे.

न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांच्या खंडपीठाने हा आदेश मागे घेतला, कारण खंडपीठाने आदेश देताना कलम 67 बी (बी) चा चुकीचा अर्थ लावला होता.

यावेळी खंडपीठाने म्हटले की, "आम्हीही माणूस आहोत आणि आमच्याकडूनही चुका होतात. सुधारणेला नेहमीच वाव असतो. या संदर्भात चौकशी होऊन नवीन आदेश काढला जाईल त्यामुळे आधी दिलेला आदेश रद्द करण्यात आला आहे."

न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांनी यापूर्वी इनायतुल्ला एनवरील आरोप फेटाळून लावताना म्हटले होते की, केवळ अश्लील कंटेंट पाहिल्यामुळे व्यक्ती आरोपी बनत नाही, कारण कंटेंट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे कलम 67बी अंतर्गत दंडनीय आहे.

तथापि, राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर, न्यायालयाने असे निरीक्षण केले की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशात कलम 67बी च्या कलम (बी) कडे दुर्लक्ष झाले होते.

या तरतुदीत असे नमूद केले आहे की, मुलांना अश्लील किंवा लैंगिकदृष्ट्या स्पष्टपणे दर्शविणारी सामग्री तयार करणे, गोळा करणे, शोधणे, डाउनलोड करणे, जाहिरात करणे, शेअर करणे किंवा वितरित करणे हे कलम 67बी च्या कक्षेत येते.

कलम 67बी (बी) या खटल्याशी संबंधित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. यासोबतच सुरुवातीच्या निर्णयात या तरतुदीचा विचार न केल्याने चूक झाल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे ही कारवाई रद्द करण्यात आली.

Child Pornography Case Karnataka High Court
NEET Result 2024: पुन्हा घोळ? गुजरातमधील एकाच सेंटरमधील 70 टक्के विद्यार्थी पात्र; नीट निकालाचे आकडे काय सांगतात?

काय होता रद्द करण्यात आलेला आदेश?

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार, इंटरनेटद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नाही. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला होता. होस्कोटेच्या एन इनायतुल्लाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली होती. ज्यात चाइल्ड पोर्नोग्राफी पाहिल्याबद्दल त्याच्यावर दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने सांगितले की, "माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67बी अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफीची निर्मिती करणे आणि वितरित करणे यासाठी शिक्षा लागू आहे. याचिकाकर्त्याने चाइल्ड पोर्नोग्राफी बनवली किंवा शेअर केली नसून ती फक्त पाहिली असल्याने, न्यायालयाला या कलमाखालील गुन्ह्यासाठी कोणताही आधार सापडला नाही. त्यामुळे आरोपीवरील खटला रद्द करण्यात येत आहे."

Child Pornography Case Karnataka High Court
Kerala Nipah: केरळ प्रशासनाचे धाबे दणाणले, 14 वर्षाच्या मुलाला निपाहची लागण, किती आहे धोकादायक?

काय आहे प्रकरण?

याचिकाकर्ते इनायतुल्ला यांच्यावर 23 मार्च 2023 रोजी दुपारी 3:30 ते 4:40 च्या दरम्यान मोबाईल फोनवर चाइल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचा आरोप आहे. त्यांच्यावर 3 मे 2023 रोजी बेंगळुरू सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये कलम 67बी अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती.

याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला, “याचिकाकर्त्याला लहान मुलांची अश्लील छायाचित्रे पाहण्याचे व्यसन आहे. तथापि, त्याने कोणताही व्हिडिओ तयार केलेला नाही किंवा कोणाशीही शेअर केलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण रद्द करण्यात यावे.” त्यानंतर फिर्यादी पक्षाने याला विरोध केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com