आई मुलाला सतत रागवायची. असे नको करू तसे नको करू म्हणत सतत टसटस करायची. यामुळे मुलगा त्रस्त झाला होता. याच त्रासाला कंटाळून मुलाने मानेची नस कापून तलावात उडी घेत आत्महत्या (suicide) केली. मयंक खंडेलवाल (२३) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ही घटना राजस्थानच्या भरतपूर कामा शहरात घडली. (Child suicide due to mother)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंकचे वडील भाजी मंडईत भाजीचे दुकान चालवतात. मयंक हा अभ्यासात खूप हुशार होता. तो बीएससी पास झाला होता. तसेच सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्यांच्या घरात भांडण नव्हते. सगळे शांततेत राहत होते. मयंकने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मयंकने सुसाईड नोटमध्ये (Suicide note) आईवर ठपका ठेवला आहे.
‘मी स्वतः खूप अस्वस्थ झालो आहे. मी तुम्हालाही त्रास देत आहे. माझी स्वप्ने कदाचित आवाक्याबाहेर होती. आई, खरं सांगू तर तुझ्या रोक-टोकीमुळे मी खूप अस्वस्थ झालो. त्यामुळे कुणाशीही बोलावसं वाटत नव्हतं. इतके दिवस मी तुझ्याशी बोलत नव्हतो. याचं कारण होतं टेन्शन आणि पेपरचं टेन्शन. आता माझेही मन भरून आले आहे.’ असे आत्महत्या करण्यापूर्वी मयंकने सुसाईट नोटमध्ये लिहिले.
‘मी तुझी स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही, मला माफ कर. हात जोडून विनंती करतो की, मी गेल्यानंतर कोणतीही चौकशी करू नका किंवा स्वतःवर किंवा कोणावरही आरोप करू नका. सनी, माझ्या जाण्यानंतर पालकांची काळजी घे आणि कृपया अजिबात त्रास देऊ नकोस. मम्मी पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात.’ असेही मयंकने सुसाईट नोटमध्ये (Suicide note) लिहिले आहे. सनी हा मृताचा लहान भाऊ आहे.
मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात
तरुणाने आत्महत्या (suicide) केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तलावातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त केली असून तपास सुरू आहे, असे कामा पोलिस ठाण्याचे प्रभारी दौलत साहू यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.