नवी दिल्ली - येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्य युनिटकडून 17 सप्टेंबर रोजी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येणार आहे. (Narendra Modi Birthday news)
लहान मुलांना देण्यात येणारी अंगठी सुमारे 2 ग्रॅम असेल. याबाबत आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपचे तामिळनाडू युनिट नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देईल. यासोबतच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ७२० किलो मासळी वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपने चेन्नईतील आरएसआरएम रुग्णालयाची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. जिथे 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या सर्व मुलांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाईल, या अंगठीची किंमत सुमारे 5 हजार रुपये आहे.
यावर आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियान यांनी म्हटलं की, मोफत पाणी आणि वीज त्यांना खूप जड वाटत होती. मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टात यावर काय बोलणार? या फुकटच्या रेवडी नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.