Children's Day: आपल्या घरातील लहान मुलांना 'या' गोष्टी करा गिफ्ट

तुम्ही एखाद्या छोट्याशा ट्रेक किंवा पिकनिकचे देखील आयोजन करू शकता.
Children's Day
Children's DayEsakal
Updated on

वर्षभरातील 365 दिवसांचा अभ्यास केला तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतंच…त्यापैकीच आजचा 14 नोव्हेंबर हा दिवस…देशभरात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन साजरा करण्यात येतो.

14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. घरभर आनंद निर्माण करणारी, हसरी-खेळणारी मुलं सगळ्यांनाच प्रिय असतात. लहान मुलांच्या नाकावर राग येवो किंवा त्यांचा वाढदिवस असो, अनेकदा आपण त्यांना गिफ्ट्स देत असतो. गिफ्टमध्ये एखादं खेळणं, कपडे किंवा त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट ठरलेलीच असते. मात्र, खेळणं, गेम्सव्यतिरिक्त लहान मुलांना अशी काही तरी भारी त्यांना आवडतील अशा गोष्ट गिफ्ट करा, जे त्यांचे ज्ञान वाढवण्यास उपयोगी होतील. 

1) ज्ञानात भर पाडणारं एखाद सुंदर गिफ्ट तुम्ही देऊ शकता. आपल्या मुलाने काही तरी चांगल्या गोष्टीचे ज्ञान संपादित करावे असे वाटत असल्या तुम्ही बालक दिनानिमित्त त्याला खेळण्यांव्यतिरिक्त एखाद्या ऐतिहासिक संग्रहालयात किंवा एखाद्या विज्ञान प्रदर्शन यांसारख्या ज्ञानाच भंडार असलेल्या ठिकाणी घेऊन जा. अशा ठिकाणी भेट दिल्यामुळे लहान मुल हे नाविन्यपूर्ण गोष्टी आपोआप आत्मसात करतात. 

2) तुम्ही एखाद्या छोट्याशा ट्रेक किंवा पिकनिकचे देखील आयोजन करू शकता. त्यात तुम्ही आपल्या मुलाच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील घेऊन जाऊ शकता.त्यामुळे लेकरं मनसोक्त निसर्गरम्य ठिकाणी खेळू शकतील आणि त्यातून त्यांना आनंद मिळेल.निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी पाहून मुलंदेखील खूश होतील आणि त्यांचे ज्ञानही वाढण्यास मदत होईल.

Children's Day
Winter Recipe: जवसची खमंग चटणी कशी तयार करायची?

3) एखादे रोपटे तुम्ही तुमच्या मुलाला गिफ्ट करू शकता. समजा तुम्ही तुमच्या लहान मुलांना एखादे रोपटे किंवा झाड गिफ्ट म्हणून दिल्यास पर्यावरणाप्रति त्यांची जागरुकता आपोआप वाढेल. गिफ्ट केलेले रोपटे घराच्या बालकनीमध्ये लावून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही मुलांवर द्यावी त्यातून त्याच्या निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकले. एखादी गोष्ट वाढवण्यासाठी आपल्या काय काय करावे लागते? कशी काळजी घ्यावी लागते याची त्या लहान मुलाला जाणिव होईल.

4) आपल्या मुलांच्या छंदानुसार त्याला गिफ्ट द्या.मुलांना नेहमी त्यांच्या आवडत्या छंदानुसार गिफ्ट द्यावं. जर समजा तुमच्या मुलांना चित्रकला, संगीताची आवड असल्यास त्यांना खेळण्याऐवजी रंगपेटी, चित्रकलेचे कागद, गिटार, माउथ ऑर्गन इत्यादी गोष्टी गिफ्ट कराव्यात. यामुळे त्यांचे कलाकौशल्य वाढवण्यासही मदत होते.आणि त्याच्यातील कौशल्यांचा आपोआप विकास होतो.

Children's Day
Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ?

5) लहानपणीच्या आठवणी नेहमी ताज्या ठेवण्यासाठी त्यांना एक फोटो अल्बम जरुर गिफ्ट करावा. यामध्ये नवीन-जुने फोटो लावून आठवणींची साठवण करायला त्यांना शिकवावे. मुलं मोठी झाल्यानंतर लहानपणीच्या आठवणी पाहून त्यांना नक्कीच आनंद होईल.

6) आणखी एक गोष्ट म्हणजे Children's Day च्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस तुमच्या मुलासोबत घालवून त्याला वेळ द्यावा. त्या सोबत आई वडिलांनी एकत्र बसुन वेगवेगळ्या कराव्या त्यामुळे देखील आपले लेकरु हे खूश होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.