नवी दिल्ली - ‘दिल्लीसह उत्तर भारतातील वाढत्या प्रदूषणामुळे बालकांचे भविष्य संकटात आहे, ज्येष्ठ नागरिकांना श्वासोच्छवासास त्रास होत आहे, पर्यावरणाचे हे संकट शेकडो लोकांचे आयुष्य संपवित असल्याने या बाबींवर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असून या जीवघेण्या प्रदूषणामुळे दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.