गलवान संघर्षानंतर चीनचं संरक्षण बजेट 52 बिलियन डॉलरनी वाढलं, भारताचं एकूण बजेट मात्र फक्त…

china increased defense budget by 52 billion dollars after galwan clash india total budget is 71 billion
china increased defense budget by 52 billion dollars after galwan clash india total budget is 71 billion
Updated on

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली. यादरम्यान भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिक तवांग सेक्टरमध्ये घुसले होते. यानंतर भारतीय लष्कराने त्यांना प्रत्युत्तर दिले. चीनच्या सैनिकांची संख्या 300 च्या आसपास असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

'द हिंदू' मधील वृत्तानुसार, या चकमकीत चीनच्या पीएलएचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले असून त्यांचे अधिक सैनिक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत याप्रकरणी बोलताना सांगितले की, चिनी सैन्याने सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आणि झटापट केली. आपल्या जवानांनी शौर्याने प्रत्युत्तर दिले. तसेच या घटनेत आपल्या एकाही जवानाला गंभीर दुखापत झालेली नाही किंवा एकाही जवानाला जीव गमवावा लागला नाही असे ते म्हणाले.

हेही वाचा - इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

china increased defense budget by 52 billion dollars after galwan clash india total budget is 71 billion
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या बदलीमागे तानाजी सावंत? 'त्या' पत्रातून मोठा खुलासा

चीनचे संरक्षण बजेट 3 पट जास्त

चीन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने संरक्षण बजेटमध्ये वाढ करत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, गलवान आणि लडाखमध्ये भारतासोबत झालेल्या चकमकीनंतर चीनने आपले वार्षिक बजेट यावर्षी 261 बिलियन डॉलरपर्यंत वाढवले. जे 2021 मध्ये 209 बिलियन डॉलर होते.

china increased defense budget by 52 billion dollars after galwan clash india total budget is 71 billion
Avatar 2 : जगातला सर्वात महागडा चित्रपट! अंडरवॉटर शूटसाठी झाला 'इतका' खर्च

भारत खूपच मागे..

दुसरीकडे, भारताचे वार्षिक संरक्षण बजेट 71.1 बिलियन डॉलर आहे. संरक्षण बजेटच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, मात्र चीनचे संरक्षण बजेट भारताच्या 3 पटीने जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.