China Map
China MapESAKAL

China Map: अक्साई चीनमध्ये भुयारी गुप्त ठिकाणं, नविन रस्ते; सॅटेलाईट छायाचित्रांमधून उघड

Published on

China MAP PLA scaling up in Aksai Chin Satellite data imagery

नवी दिल्ली- अक्साई चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरु असून अंडरग्राऊंड गुप्त ठिकाणेही मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. संघर्षाच्या काळात शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हवाई हल्ल्यांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी ही तयारी करण्यात आल्याचं सॅटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमधून दिसत आहे.

चीनने नुकताच आपल्या देशाचा नकाशा जाहीर केला होता. यात चीनने अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश देशाचा भाग असल्याचं दाखवलं होतं. चीनच्या मंत्रालयाकडून सोमवारी हा नकाशा जाहीर तरण्यात आला होता. यावर भारत सरकारकडून आक्षेप घेण्यात आलाय. चीनने हा नकाशा समोर आणल्यानंतर सॅटेलाईट छायाचित्रांमधून अक्साई चीनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती कार्य सुरु असल्याचं दिसतंय.

China Map
India-China Dispute: हजारो सैनिक, 100 रणगाडे अन्… चीन सीमेवर भारताने केली होती अशी तयारी, अहवालात खुलासा

हिंदूस्तान टाईम्सने मक्सार टेकनॉलेजीच्या माध्यमातून डिसेंबर २०२१ आणि ऑगस्ट २०२३ मधील सॅटेलाईट छायाचित्रांमधील फरक दाखवला आहे. छायाचित्रांमधून अक्साई चीनच्या १५ चौ किमीच्या प्रदेशात सहा ठिकाणी बंकर आणि अंडरग्राऊंड सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ७० किलोमीटर अंतारावर आहे. याठिकाणी चीनकडून सैन्य तैनात करण्यात आले आहेत.

China Map
Citizenship: पाच वर्षात 8 लाख लोकांनी सोडलं भारतीय नागरिकत्व; चीन-पाकिस्तानलाही बनवताहेत घर

ऑगस्टमधील छायाचित्रांमधून या भागात ये-जा करता येणारी उपकरणे, नविन रस्ते आणि प्रवेश ठिकाणे बांधल्याचं दिसतंय. तज्ञांच्या मते अंडरग्राऊड बांधणी उपकरांना, शस्त्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी बांधण्यात आलेत.हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठीही ही बांधणी चीनच्या लष्कराला उपयोगाची ठरणार आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

China Map
Chandryaan 3 : 32000 वर्षांपूर्वी वेळकाळ जाणून घेण्यासाठी व्हायची चंद्राची मदत, चीन-अरबांनी सुद्धा भारताकडून शिकून घेतली होती ही कला

चीनने सोमवारी जारी केलेल्या नकाशामध्ये, १९६२ मध्ये गिळंकृत केलेला अक्साई चीन, अरुणाचल प्रदेश दाखवला आहे. अरुणाचल प्रदेश तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनदा दावा आहे.तैवानला नकाशामध्ये स्थान देण्यात आला आहे. चीनचा अनेक भागावरुन इतर देशांची वाद आहे. नव्या नकाशामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची जी-२० संमेलनादरम्यान भेट झाली होती. यादरम्यान त्यांच्यात चर्चाही झाल्याचं सांगण्यात येतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.